karnataka Election 2023: कर्नाटकात काँग्रेसचा पराभव होणार..; बसवराज बोम्मईंचं मोठं विधान

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. 10 मे आणि 13 मे रोजी मतदान होणार आहे.
karnataka Election 2023
karnataka Election 2023 Sarkarnama

Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. 10 मे आणि 13 मे रोजी मतदान होणार आहे. राजकीय पक्ष निवडणुकांच्या रिंगणात उतरण्यासाठी तयारी लागले आहेत. कर्नाटकात काँग्रेस आणि भाजप (BJP) यावेळी पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करण्याचा दावा करत आहेत. असे असतानाच राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

राज्यात 10 मे २०२३ रोजी विधानसभा निवडणुका होणार आहेत. काँग्रेसला 60 जागांवर योग्य उमेदवार मिळत नाहीत. काँग्रेसकडे (Congress) उमेदवारांचीच कमतरता तर आहेच शिवाय त्यांना राज्यात जनाधारही नाहीये, त्यामुळे पुढच्या महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत पराभव होईल, त्यांना गेल्या वेळेपेक्षा कमी जागा मिळतील, अशी टिका मुख्यमंत्री बोम्मई यांनी केली आहे.

karnataka Election 2023
CM Eknath Shinde Ayodhya Visit : मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यापूर्वीच कार्यकर्त्यांमध्ये रेल्वेत राडा

सुमारे 60 जागांवर काँग्रेसकडे योग्य उमेदवार मिळत नाहीयेत. त्यामुळे ते लोकांना आयात करण्याचा करण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेसचे नेते डी.के. शिवकुमार आमच्या आमदारांना फोन करुन काँग्रेसमधून निवडणूक लढवण्यासाठी विचारणा करत होते. असा आरोपही बोम्मई यांनी केला आहे.

काँग्रेस आणि शिवकुमार उत्साहाच्या भरात बोलत तर आहेत, पण त्यांच्याकडे ना उमेदवार आहेत ना जनाधार, ना स्पष्ट ध्येय्ये धोरणे,मग तो आरक्षणाचा मुद्दा असो वा विकासाचा, असही बोम्मई यांनी म्हटलं आहे. दरम्यान, काँग्रेसने एकूण 224 जागांपैकी 166 जागांसाठी उमेदवार घोषित केले आहेत आणि उर्वरित 58 जागांसाठी अद्याप यादी निश्चित केलेली नाही.

उद्या (९ एप्रिल) भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित केले जाणार आहेत. या बैठकीला स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा, गृहमंत्री अमित शहा तसेच इतर नेते उपस्थित राहणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com