देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांना मंगळवारी घेराव

रविवारी रात्रीपासून देशात ठिकठिकाणी भाजप सरकारविरोधात काँग्रेसनं रान उठवलं आहे.
देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांना मंगळवारी घेराव
Congress

नवी दिल्ली : लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथील घटनेविरोधात काँग्रेसने (Congress) देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या घटनेत केंद्रीय मंत्र्यांच्या मुलानं गाडीखाली चार शेतकऱ्यांसह आठ जणांना चिरडल्याचा आरोप शेतकरी संघटनांकडून केला जात आहे. त्यावरून रविवारी रात्रीपासून देशात ठिकठिकाणी भाजप (BJP) सरकारविरोधात काँग्रेसनं रान उठवलं आहे.

लखीमपूर खीरी येथील घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसकडून मंगळवारी देशभरातील प्रत्येक जिल्ह्याधिकारी कार्यालयाला घेराव घालण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. काँग्रेससह विविध संघटनांचे कार्यकर्ते देशभरात एकाचवेळी जिल्हाधिकारी कार्यालयांना घेराव घालतील, अशी माहिती काँग्रेसचे नेते राजीव शुक्ला यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही शुक्ला यांनी केली आहे.

Congress
धक्कादायक : मुख्यमंत्र्यांनीच कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांविरोधात भडकवलं!

दरम्यान, भाजपचे खासदार वरूण गांधीही यांनीही या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांना निर्दयतापूर्वक चिरडण्याची घटना हृदयद्रावक आहे. त्यामुळं देशभरातील नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. या घटनेच्या एक दिवस आधीच अहिंसेचे पुजारी महत्वा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. दुसऱ्या दिवशी लखीमूपर खीरीमध्ये आपल्या अन्नदातांचा हत्या करण्यात आली. हे सभ्य समाजात अक्षम्य आहे. आंदोलन करणारे शेतकरी आपलेच नागरीक आहे, असं वरूण गांधी म्हणाले आहेत.

शेतकरी जर आंदोलन करत असतील तर संयम आणि धैर्याने त्यांच्याशी चर्चा करायला हवी. कोणत्याही स्थितीत शेतकऱ्यांशी केवळ आणि केवळ गांधीवादी व लोकशाही मार्गाने, कायद्याचे पालन करत वागायला हवे, असंही गांधी यांनी पत्रात म्हटलं आहे. या प्रकरणातील आरोपांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करावा. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआयमार्फत या घटनेची चौकशी व्हावी. तसेच पिडीत शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत द्यावी, अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत. यापुढील काळात अशा घटना घडू नये, यासाठी आवश्यक पावले उचलण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.

खट्टर यांच्याविरोधात रोष

हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिध्दू यांनी केली आहे. त्यामुळे खट्टर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

भाजप किसान मोर्चाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना खट्टर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. पाचशे ते हजार लोकांचे गट बनवून जशास तसे उत्तर देण्यासाठी भडकवल्याचं समोर आलं आहे. तुरूंगात गेला तर मोठे नेते बनाल, असंही ते कार्यकर्त्यांना सांगत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

Related Stories

No stories found.