काँग्रेस सुधारणांच्या मोडमध्ये पण सुरुवात राहुल गांधी परदेशातून परतल्यानंतरच होणार!

Congress | Rahul Gandhi | राजस्थान-छत्तीसगडमध्ये काँग्रेस भाकरी फिरवणार?
Sonia Gandhi and Rahul Gandhi in Congress Chintan Shivir
Sonia Gandhi and Rahul Gandhi in Congress Chintan ShivirSarkarnama

नवी दिल्ली : पंजाबमधील (Punjab) हातची सत्ता गमावल्यानंतर काँग्रेसने (Congress) आता आगामी विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले आहे. योग्यवेळी नेतृत्व बदल न करणे, संघटनेतील फेरबदलांच्या निर्णयांना विलंब यासारख्या पंजाबमधील चुकांची सुधारणा केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीसाठी नेमलेला कृतिगट विधानसभा निवडणुकांसाठीही काम करणार असून राहुल गांधी परदेश दौऱ्याहून परतल्यानंतर ही तयारी सुरू होईल. (Congress Latest News)

उदयपूरच्या चिंतन बैठकीत पक्षाच्या कार्यपद्धतीतील बदलावर व्यापक मंथन झाले होते. त्यानुसार, वेगवान निर्णय प्रक्रिया आणि गरज भासल्यास नवा चेहरा अशा गोष्टी तातडीने मार्गी लावल्या जातील असे सूत्रांनी सांगितले.

पंजाबमध्ये आधी जनमत तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्याविरुद्ध गेल्याचा अंदाज येऊनही नेतृत्व बदलाला विलंब झाला. त्यामुळे हातचे राज्य गेल्याचे पक्षनेतृत्वाचे म्हणणे आहे. त्यापार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीआधी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये विशेषतः सत्ता असलेल्या राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये चुकांची पुनरावृत्ती टाळण्याची तयारी सुरू करण्यात आली. याशिवाय कर्नाटकमध्ये सत्ताबदलाची संधी असल्याने तेथेही काँग्रेसने लक्ष केंद्रित केले आहे.

Sonia Gandhi and Rahul Gandhi in Congress Chintan Shivir
महाराष्ट्रात लोकसभेच्या ८ जागांवर भाजपचे मायक्रो प्लॅनिंग; ३ केंद्रीय मंत्र्यांवर जबाबदारी

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरुद्ध सचिन पायलट यांची धुसफूस सुरू आहे. त्यांच्या समर्थकांना मंत्रिमंडळात, महामंडळात स्थान देण्याच्या मागणीकडे होणारे दुर्लक्ष निवडणुकीत महाग पडू शकते. पायलट गट राज्यातील नेतृत्व बदलावर आग्रही असूनही पक्षनेतृत्वाने त्यावर मौन बाळगले आहे.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार राज्यसभा निवडणुकीनंतर जुलैपर्यंत राज्यातील सर्व संघटनात्मक आणि सरकारमधील विषय मार्गी लावले जातील. राजस्थानात मंत्रिमंडळ विस्तार अपेक्षित आहे. दुसरीकडे, छत्तीसगडमध्येही नेतृत्वबदलावरून मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि आरोग्य मंत्री टी. एस. सिंहदेव यांच्यातील धुसफूस शांत झालेली नाही. लवकरच हा वाद निकाली काढला जाईल असेही संकेत सूत्रांनी दिले. मात्र वाद निकाली काढणे म्हणजे नेतृत्व बदल असेल काय यावर सूत्रांनी मौन पाळले.

Sonia Gandhi and Rahul Gandhi in Congress Chintan Shivir
राणांच्या अश्रूंची संसदीय समितीने घेतली दखल; राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्लीला बोलावणं

सत्ता नसलेल्या राज्यांसाठी तयारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे मुळ राज्य असलेल्या गुजरातमध्ये, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे मुळ राज्य हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने आक्रमक रणनितीची तयारी केल्याचे समजते. गुजरातमध्ये सामूहिक नेतृत्व पुढे करून निवडणूक लढविली जाईल असे काँग्रेसमधून सांगितले जात आहे. हिमाचलमध्ये माजी मुख्यमंत्री विरभद्र सिंह यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी प्रतिभा यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपविण्यात आले असले तरी कोणाचाही चेहरा पुढे न करता सामूहिक नेतृत्वाखाली निवडणूक लढण्यास पक्षश्रेष्ठींनी सांगितल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in