यूपी, उत्तराखंडबाबत शिवराजसिंहांचं मोठं विधान अन् काँग्रेसला फुटल्या उकळ्या

उत्तरप्रदेशसह देशातील पाच राज्यांत सध्या विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.
Shivraj Singh Chouhan
Shivraj Singh ChouhanSarkarnama

नवी दिल्ली : उत्तरप्रदेशसह देशातील पाच राज्यांत सध्या विधानसभेच्या निवडणुकीची (Assembly Election) रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक पक्ष विजयाचा दावा करत आहे. पण मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांचा एक व्हिडीओ काँग्रेसकडून (Congress) व्हायरल केला जात आहे. यूपी आणि उत्तराखंडमध्ये भाजपची स्थिती कमजोर असल्याचे शिवराजसिंह सांगत असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. (Assembly Election Updates)

शिवराजसिंह हे उत्तराखंडमध्ये भाजपच्या (BJP) प्रचारात व्यस्त आहेत. भाजपच्या स्टार प्रचारकांमध्ये त्यांचाही समावेश आहे. उत्तराखंडमध्ये प्रामुख्याने भाजप व काँग्रेसमध्ये टक्कर होत आहे. निवडणुकीआधी घेण्यात आलेल्या कल चाचण्यांमध्ये अनेकांनी भाजप व काँग्रेसमध्ये सत्ता मिळवण्यासाठी चढाओढ असल्याचे दिसून आले आहे. तसेच उत्तर प्रदेशातही भाजपच्या जागा कमी होण्याची शक्यता आहे. (UP Election 2022)

Shivraj Singh Chouhan
जामीन मिळाला तरी मंत्रिपुत्र दोन गंभीर कलमांमध्ये अडकला अन्...

त्यातच शिवराजसिंह यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते एका व्यक्तीशी बोलताना दिसत आहेत. या चर्चेदरम्यान ती व्यक्ती शिवराजसिंह यांना उत्तराखंडमधील भाजपच्या स्थितीबाबत प्रश्न विचारते. त्यावर उत्तर देताना शिवराजसिंह म्हणतात, 'मला तर वाटते उत्तर प्रदेशात काहीच शंका नाही. उत्तराखंडमध्येही भाजप आहे. पण थोडा मुकाबला होईल.' (Uttarakhand Election 2022)

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर काँग्रेसकडून व्हायरल केला जात आहे. मध्य प्रदेश काँग्रेसकडून ट्विटरवर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 'यूपी आणि उत्तराखंडमध्ये भाजपच्या खूपच कमजोर स्थितीबाबत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान माहिती देत आहेत. भाजप तर गेली,' असं ट्विट काँग्रेसनं केलं आहे.

भाजपच्या मंत्री म्हणाले, पाचही राज्यांत काँग्रेसची सत्ता

मध्य प्रदेशचे परिवहन मंत्री गोविंद सिंह राजपूत यांनी गुरूवारी माध्यमांशी बोलताना पाचही राज्यांत काँग्रेसची सत्ता येईल, असं वक्तव्य केलं. पण आपली चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी काँग्रेसऐवजी भाजप असा उल्लेख केला. ते म्हणाले, राम मंदिर पंतप्रदान मोदी यांच्या सहयोगाने आणि मुख्यमंत्री योगी यांच्या विशेष प्रयत्नातून बनत आहे. त्यामुळे उत्तराखंड असो किंवा गोवा, पंजाब आणि उत्तर प्रदेश, सर्व राज्यांत काँग्रेसचे बहुमत असेल, असे राजपूत म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com