भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय अडचणीत...काँग्रेस नेत्यांवरील टीका भोवणार

मध्य प्रदेशात विधानसभा पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांकडून प्रचाराला जोर आला असून, राजकीयचिखलफेकही वाढली आहे.
Congress complains to Police against BJP leaders for foul remarks
Congress complains to Police against BJP leaders for foul remarks

भोपाळ : मध्य प्रदेशात 28 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. भाजप नेत्यांकडून काँग्रेस नेत्यांवर खालच्या पातळीवरील टीका केली जात आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. या प्रकरणी काँग्रेसने पोलीस उपमहानिरीक्षकांकडे लेखी तक्रार केली आहे. भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांच्यासह इतर नेत्यांविरोधात ही तक्रार असून, यामुळे ते अडचणीत आले आहेत. 

मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण आता पुन्हा तापू लागले आहे. राज्यात 28 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहे. या निवडणुका 9 नोव्हेंबरला  होत आहेत. काँग्रेसचे सरकार पाडणाऱ्या भाजपला धडा शिकवण्यासाठी काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी कंबर कसली आहे. राज्यातील भाजप नेत्यांना फोडून ते मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.  

जोतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत 22 आमदार काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले होते. त्यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडले होते. आता राज्यात एकूण 28 मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहेत. यातील तब्बल 16 ग्वाल्हेर भागातील आहेत. शिंदे यांच्या ग्वाल्हेर या बालेकिल्ल्यात कमलनाथ यांनी काही दिवसांपूर्वी जोरदार शक्तिप्रदर्शनही केले होते. 

काँग्रेस नेते विनय बाल्कीवाल यांनी आज पक्षाच्या शिष्टमंडळासह पोलीस उपमहानिरीक्षक चारी मिश्रा यांची भेट घेतली. त्यांनी भाजप नेते कैलास विजयवर्गीय, उमेश शर्मा यांच्यासह इतर नेत्यांविरुद्ध तक्रार दिली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि दिग्विजयसिंह यांच्याबद्दल खालच्या पातळीवर टीका भाजप नेत्यांनी केल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. 

याबाबत बोलताना बाल्कीवाल म्हणाले की, कैलास विजयवर्गीय यांनी आमच्या राष्ट्रीय नेत्यांविरोधात अवमानजनक विधाने केली आहेत. याचबरोबर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी राहुल गांधी, कमलनाथ आणि दिग्विजयसिंह यांच्यावर खालच्या पातळीवरील टीका केली. आमच्या नेत्यांवर टीका करताना ते गोमूत्र शब्दाचा वापर करीत आहेत. भाजपची राज्यात 15 वर्षे तर कमलनाथ यांची केवळ 15 महिने सत्ता होती. कमलनाथ यांनी विकास केल्याने भाजप नेत्यांकडे बोलण्यासारखे काही नाही. 

दिग्विजयसिंह आणि कमलनाथ हे 'चुन्नू मुन्नू' असल्याची टीका कैलास विजयवर्गीय यांनी 14 ऑक्टोबरला केली होती. दोघांना सभेसाठी शंभर लोकही गोळा करता येत नव्हते, असेही ते म्हणाले होते. त्यानंतर काँग्रेस नेते सज्जनसिंह यांनी विजयवर्गीय यांना लक्ष्य केले होते. ते म्हणाले होते की, विजयवर्गीय यांच्या पक्षानेच त्यांना बंगालमध्ये फेकून दिले आहे. तिथे ते ममता बॅनर्जी यांच्याशी हुज्जत घालत आहेत. परंतु, त्या विजयवर्गीय यांच्यापेक्षा मोठ्या जादूगार आहेत. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com