Congress अधिवेशनात राहुल गांधींच्या प्रस्तावाला केराची टोपली ; 'एक व्यक्ती-एक पद..'

Congress Session Raipur Rahul Gandhi : हा प्रस्ताव मंजूर होण्याची अपेक्षा अनेक काँग्रेस नेत्यांना होती, पण त्यांचा आशेवर पाणी फिरले आहे.
Congress Session Raipur Rahul Gandhi
Congress Session Raipur Rahul Gandhi Sarkarnama

Congress Session Raipur rahul gandhi : छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे काँग्रेसचे ८५ वे राष्ट्रीय अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाचा आज (रविवार) तिसरा दिवस आहे. काल (शनिवारी) अधिवेशनात अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. (Congress Session Raipur News update)

काँग्रेस कार्यकारीणी समिती (CWC)च्या स्थायी समिती सदस्यांची संख्या वाढवून ३५ करण्यात आली आहे. तर दुसरीकडे उदयपूर येथे नुकत्याच झालेल्या नवसंकल्प शिबिरातील मोठ्या प्रस्तावाकडे या अधिवेशनात दुर्लक्ष करण्यात आले आहे.

Congress Session Raipur Rahul Gandhi
Pune Bypoll Election : कसब्यात दुहेरी, तर चिंचवडला तिंरगी लढत ; मतदानास सुरवात

आज (रविवारी) अधिवेनाच्या तिसऱ्या दिवशी मोठ्या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. अधिवेशनात अनेक संशोधन विषयांना मंजूरी देण्यात आली आहे, तर काही नियमांना मंजुरी देण्यात आली आहे. पण उदयपूरच्या शिबिरात झालेल्या अनेक प्रस्तावावर चर्चा करण्याचे अधिवेशना टाळण्यात आल्याचे चर्चा काँग्रेसच्या गोटात सुरु आहे.

काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांची नुकतीच भारत छोडो यात्रा काढली होती, यात त्यांना एक मोठा प्रस्ताव मांडला होता. हा प्रस्ताव या अधिवेशनात मंजूर होण्याची अपेक्षा अनेक काँग्रेस नेत्यांना होती, पण त्यांचा आशेवर पाणी फिरले आहे.

Congress Session Raipur Rahul Gandhi
Yogi Adityanath : माजी मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री म्हणाले, 'लाज वाटली पाहिजे तुम्हाला, वडिलांचा सन्मानही करता आला नाही..

भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी 'एक व्यक्ती-एक पद'या प्रस्तावाला या अधिवेशनात केराची टोपली दाखवली आहे. या प्रस्ताव मंजूर झाला असता तर काँग्रेसमध्ये मोठे परिवर्तन झाले असते, अनेक नेत्यांकडे दोन-तीन पदे आहेत. त्यांच्याकडील ही पदे काढून नव्या नेतृत्वाकडे ही पदे देण्यात येईल, असा विश्वास अनेकांना होता. पण या प्रस्तावाची चर्चा करण्याचे पक्षश्रेष्ठींनी टाळल्याचे समजते.

उदयपूरच्या शिबिरात आणखी एक महत्वाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता तो म्हणजे 'एक परिवार-एक तिकिट'. या प्रस्तावाकडेही नेत्यांसह पक्षश्रेष्ठींनी दुर्लक्ष केल्याचे दिसते. यामुळे काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

काल (शनिवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी काँग्रेस पक्षाची नवी घोषणा दिली आहे. 'सेवा, संघर्ष, बलिदान - सर्वप्रथम हिंदुस्थान' ही पक्षाची नवी घोषणा असेल, असे खर्गे म्हणाले. तर पक्षाच्या नेत्या व माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी आपल्या भाषणात सक्रिय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com