Rajasthan Politics News : गेहलोत-पायलट संघर्ष पुन्हा पेटला ; आपल्याच सरकारविरोधात पायलटांनी ठोकला शड्डू

Sachin Pilot Will Go On Hunger Strike Today : आपल्याच सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.
Ashok Gehlot, Sachin Pilot
Ashok Gehlot, Sachin PilotSarkarnama

Sachin Pilot Will Go On Hunger Strike Today Against his own government : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे.

पायलट यांनी स्वत:च्या पक्षाच्या विरोधात आघाडी उघडल्याने काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वासाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. राज्यस्थानमध्ये गेहलोत-पायलट संघर्ष पुन्हा पेटला आहे.

Ashok Gehlot, Sachin Pilot
PM Modi Degree : पंतप्रधान किती शिकलेले, हे जाणून घेण्याचा देशाला अधिकार नाही का? केजरीवालांचा सवाल!

वसुंधरा सरकारवर झालेल्या आरोपांची चौकशी गेहलोत सरकार करत नसल्याने सचिन पायलट आज (सोमवारी) हुतात्मा स्मारकावर एकदिवसीय उपोषणकरणार आहेत. ४५ हजार कोटींच्या गैरव्यवहाराची तपासणी करण्याची मागणी पायलट यांनी केली आहे. सचिन पायलट यांनी आरोप करुन आपल्याच सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.

"भाजप सरकारच्या कार्यकाळात राज्यात कोट्यावधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. सत्तेत आल्यावर आम्ही वसुंधरा राजे सरकारने केलेल्या भष्ट्राचाराविरोधात कारवाई करणार असे आश्वासन जनतेला दिले होते. राज्यात काँग्रेसची सत्ता येऊन साडेचार वर्ष झाले पण अद्यापही गेहलोत सरकारने तत्कालीन भष्ट्र भाजप सरकारवर कुठलीही कारवाई केली नाही," असे पायलट यांनी काल (रविवारी) पत्रकारांना सांगितले.

Ashok Gehlot, Sachin Pilot
Chhatrapati Shivaji Statue News : धक्कादायक : शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ; नागरिक रस्त्यावर..

पायलट म्हणाले, "राज्यात भाजपची सत्ता असताना आम्ही विरोधी पक्षात होतो, तेव्हा अशोक गेहलोत यांनी वसुंधरा राजे सरकारने केलेल्या भष्ट्राचाराची चौकशी करुन कारवाई करण्याचे आश्वासन जनतेला दिले होते. पण सत्तेत येऊन आम्हाला साडेचार वर्ष झाल्यानंतरही गेहलोत सरकार मूग गिळून गप्प आहे. जनतेला दिलेली आश्वासने आपण पूर्ण केली नाही तर जनतेला वाटेल की सरकारची भाजपसोबत मिलीभगत आहे,"

"जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याने वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री गेहलोत यांना पत्र लिहून जनतेला दिलेले आश्वासन पू्र्ण करण्याची विनंती केली होती. त्या पत्राचे मला अद्यापपर्यंत उत्तर मिळाले नाही," असे पायलट म्हणाले. त्यानंतर पायलट यांनी अजून एक पत्र लिहिलं. त्या पत्राला गेहलोत यांनी केराची टोपली दाखवली.

Ashok Gehlot, Sachin Pilot
BJP News : भाजपमध्ये इनकमिंग सुरूच ; अकाली दल, अन्नाद्रमुकचे नेते भाजपमध्ये...

"सरकारने आमच्यावर विश्वास दाखवला, त्यामुळे काँग्रेसला २१ जागावरुन १०१ जागा मिळाल्या. त्यामुळे जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण करणे हे आपलं कर्तव्य आहे, असे पायलट म्हणाले. या सगळ्या प्रकारला कंटाळून पायलट ११ एप्रिल रोजी जयपूर येथील शहीद स्मारकासमोर धरणे आंदोलन करणार आहे. सुडबुद्धीचं राजकारण न करता, भाजपने केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी केली पाहिजे," असे पायलट यांनी सांगितले.

राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीसाठी सहा-सात महिने राहिले आहेत. आताही वेळ गेलेली नाही. कोळसा गैरव्यवहार, दारु गैरव्यवहार, ललित मोदी प्रकरण आदी विषयांची सीबीआय चौकशी करुन दोषींवर गेहलोत सरकारने कारवाई केली पाहिजे, असे पायलट म्हणाले.

(Edited By Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com