विधान परिषदेसाठी कॉंग्रेसकडून तीन नावांची शिफारस

भाजपच्या पुढे एक पाऊल टाकले आहे.
Congress
CongressSarkarnama

बेळगाव : विधान परिषद निवडणुकीची घोषणा अद्याप झाली नसली तरी कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने आतापासूनच तयारी सुरु केली आहे. दोन्ही पक्षांतील इच्छुकांची संख्या वाढली आहे. बेळगावातून विधान परिषदेसाठी कॉंग्रेसने तिघांच्या नावांची शिफारस कर्नाटक प्रदेश कॉंग्रेस समितीकडे करून भाजपच्या पुढे एक पाऊल टाकले आहे. (Congress recommends three names for the Belgaum Legislative Council seats)

कॉंग्रेसमधून विधान परिषद निवडणूक लढविण्यासाठी अनेक नावांची चर्चा सुरु आहे. इच्छुकांनी आपले अर्ज जिल्हा कॉंग्रेस कमिटीकडे पाठवले आहेत. मात्र, बेळगाव जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत तिघा जणांची शिफारस केपीसीसीकडे करण्यात आली आहे. त्यात ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे बंधू चन्नराज हट्टीहोळी, गोवा कॉंग्रेसचे प्रभारी सुनील हणमण्णवर आणि किरण साधुण्णवर यांच्या नावांचा समावेश आहे.

Congress
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत परिवहन मंत्री परबांचे महत्वाचे विधान

या तिघांपैकी चन्नराज यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते. त्यांनी याआधीच बेळगाव विभागातील विविध ग्रामपंचायती, तालुका पंचायत सदस्यांची भेट घेण्यास सुरवात केली आहे. दिवाळीचे औचित्य साधून त्यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत सदस्यांना शुभेच्छा पत्रे पाठविली आहेत. यामुळे त्यांनी प्रचाराला सुरवात केल्याचे मानले जात आहे.

Congress
पक्षश्रेष्ठींची चिंता वाढली : कोणत्या दिग्गजांना थांबवायचे?

पुढील वर्षाच्या जानेवारी किंवा फेब्रुवारीत विधान परिषद निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे. आतापासूनच कॉंग्रेस व भाजपमधील इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी केली आहे. मात्र, या शर्यतीत जनता दल धर्मनिरपेक्ष (धजद) कुठेच दिसत नाही. यामुळे विधान परिषद निवडणुकीत भाजप व कॉंग्रेस उमेदवारांमध्येच थेट लढत होण्‍याची शक्यता आहे. मात्र, महाराष्ट्र एकीकरण समितीने या निवडणुकीत आपले उमेदवार उभे केल्यास या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांचे गणित निश्र्चितच चुकणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com