राहुल गांधींना झटका ; वायनाडमध्ये बड्या नेत्याचा राजीनामा

जिल्हा काँग्रेस समितीचे माजी अध्यक्ष पी. व्ही. बालचंद्रन (p. V. Balachandran) यांनी राजीनामा दिला आहे. वायनाडमध्ये काँग्रेसमध्ये होत असलेल्या राजीनाम्यांचे सत्र सुरु आहे.


राहुल गांधींना झटका ; वायनाडमध्ये बड्या नेत्याचा राजीनामा
p. V. Balachandransarkarnama

वायनाड : कॉग्रेसला केरळमध्ये आणखी एक बसला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) ज्या वायनाड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात तेथील जिल्हा काँग्रेस समितीचे माजी अध्यक्ष पी. व्ही. बालचंद्रन (p. V. Balachandran) यांनी राजीनामा दिला आहे. वायनाडमध्ये काँग्रेसमध्ये होत असलेल्या राजीनाम्यांचे सत्र सुरु आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी वायनाडमधून लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले आहेत. माजी आमदार के. सी. रोसाकुट्टी, केपीसीसी सचिव एमएस विश्वनाथन आणि डीसीसी सरचिटणीस अनिल कुमार यांनी या वर्षी एप्रिलमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्ष सोडला होता. बालचंद्रन गेली तब्बल ५२ वर्षे काँग्रेसमध्ये होते. केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीचे (केपीसीसी) कार्यकारी समिती सदस्य बालचंद्रन यांनी बहुमत आणि अल्पसंख्यांक दोन्ही समुदाय काँग्रेसपासून दूर जात असल्याचाआरोप त्यांनी केला आहे.

 p. V. Balachandran
योगी सरकार अन् तालिबान्यांमध्ये फरक फक्त दाढीचा !

पत्रकार परिषदेत बालचंद्रन यांनी कॉग्रेसला सोडचिट्टी देण्याचा निर्णय जाहीर केला. पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, राज्य नेतृत्व हे ते लोकांना प्रभावित करणाऱ्या मुद्यांवर स्पष्ट राजकीय भूमिका घेऊ शकत नाहीत. काँग्रेसला कार्यकर्त्यांच्या भावनांनुसार काम करता येणार नाही असे वाटत असल्याने पक्ष सोडत आहे. केवळ बहुसंख्यांकच नव्हे तर अल्पसंख्यांकही काँग्रेस सोडत आहेत. ते दिशा गमावलेल्या पक्षाबरोबर राहू शकत नाहीत.

Related Stories

No stories found.