Rahul Gandhi : राहुल गांधींना आणखी एक धक्का ; RSS ला 'कौरव' म्हणणं अंगलट ; मानहानीची नोटिस ; काय आहे प्रकरण ?

RSS-Rahul Gandhi controversy : कौरव खाकी पॅट परिधान करतात..
RSS-Rahul Gandhi controversy
RSS-Rahul Gandhi controversySarkarnama

Rahul Gandhi on rss kaurav controversy : 'मोदी'आडनावावरुन खासदारकी रद्द झालेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाही.

दोन वर्ष शिक्षा सुनावल्यानंतर खासदारकी केली, त्यानंतर सरकारी निवासस्थान खाली करण्याची नोटिस मिळाली, आता पुन्हा एका प्रकरणात राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) बदनामी केल्याप्रकरणी राहुल गांधींना ही नोटिस बजावण्यात आली आहे. त्याची सुनावणी १२ एप्रिल रोजी होणार आहे. आरएसएसचे कार्यकर्ता कमल भदौरिया यांनी उत्तराखंडच्या हरिव्दार येथील सत्र न्यायालयात राहुल गांधी यांच्या विरोधात हा दावा केला आहे.

RSS-Rahul Gandhi controversy
BJP : भाजप मंत्र्याच्या घरावर झळकले 'मोदी हटाओ देश बचाओ' चे बॅनर ; काय आहे प्रकरण ?

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मिरमधील कलम ३६० कलम रद्द केले, मुस्लिम महिलांना 'तीन तलाक' मधून दिलासा दिला, राममंदीर उभारणीचे काम सुरु आहे आहे. देशात कोणतेही संकट आले तरी आरएसएस महत्वाची जबाबदारी पार पाडतो, अशा परिस्थितीत राहुल गांधी यांनी ९ जानेवारी २०१३ रोजी कुरुक्षेत्र अंबाला येथील एका कार्यक्रमात आरएसएसचा उल्लेख २१ व्या शतकातील कौरव असा केला आहे. राहुल गांधी म्हणाले होते की आजचे कौरव खाकी पॅट परिधान करतात, हातात काठी घेतलेले असतात," असे कमल भदौरिया यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

RSS-Rahul Gandhi controversy
Naresh Mhaske : 'अजितदादांचे पुतळे जाळा' असे सांगणे ही गद्दारी की खुद्दारी ? ; आव्हाडांना म्हस्केंचा सवाल

"हा देश पुजाऱ्यांच्या नव्हे तर तपस्वी लोकांचा आहे," असे राहुल गांधी म्हटले होते.त्यांच्या या विधानाने मानहानी झाल्याचे भदौरिया यांचे मत आहे. मोदी आडनाव प्रकरणावरुन सुरत न्यायालयाप्रमाणे बिहारमध्येही राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल आहे.याप्रकरणी त्यांना पाटना येथे १२ एप्रिल रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. त्याबाबत न्यायालयाने त्यांना नोटिस पाठवली आहे.

RSS-Rahul Gandhi controversy
Maharashtra Politics : मुख्यमंत्री शिंदेंचा अपमान ; राऊतांवर मानहानीचा दावा ; राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर...

या प्रकरणात ६ जुलै २०१९ रोजी राहुल गांधी हे पाटना न्यायालयात हजर होते. तेव्हा त्यांना जामीन मिळाला होता. आता पाटनाच्या विशेष एमपी एमएलए कोर्ट (Special MP MLA Court) त्यांना उपस्थित राहावे लागणार आहे, असे भाजप नेता सुशील मोदी (Sushil Kumar Modi) यांनी सांगितले. त्यांनी याप्रकरणी याचिका दाखल केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com