कोरोनाचा धोका; सोनिया गांधींना तातडीनं रुग्णालयात हलवलं

सोनिया गांधी यांना दोन जून रोजी कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
 Sonia Gandhi Latest Marathi News
Sonia Gandhi Latest Marathi NewsSarkarnama

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना रविवारी दुपारी तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. दहा दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पण अद्याप त्यातून त्या बऱ्या झालेल्या नाहीत. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून सध्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी दिली. (Sonia Gandhi Latest Marathi News)

सोनिया गांधी यांना दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना दोन जून रोजी कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले होते. सुरजेवाला यांनी याबाबत ट्विट केले आहे. सोनिया गांधी यांना रुग्णालयात डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवले जाईल. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. सर्व शुभचिंतकांचे आभार, असं सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खऱगे यांनीही सोनिया गांधींना लवकर बरे वाटावे, यासाठी प्रार्थना केली आहे. (Sonia Gandhi was admitted to Hospital today owing to Covid related issues)

 Sonia Gandhi Latest Marathi News
पवारांनीही फडणवीसांचं कौतुक केलं पण पंकजा मुंडेंचं मौन का? राजकीय चर्चांना उधाण

दरम्यान, नॅशनल हेरॉल्डशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सोनिया गांधींसह राहुल गांधी यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. याआधी ईडीने आठ तारखेला दोघांनाही चौकशीसाठी बोलावले होते. पण कोरोनाचा संसर्ग झाल्याने सोनिया गांधी यांनी मुदत मागितली होती. त्यांना आता 23 जून रोजी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. तर राहुल गांधी यांना 13 जून रोजी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

मुंबई, नागपूरात सोमवारी आंदोलन

दरम्यान, काँग्रेस सोमवारी मुंबई आणि नागपूर येथील ईडी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिली आहे. यावेळी बोलताना अतुल लोंढे म्हणाले, ''या प्रकरणात एका पैशाचाही गैरव्यवहार झालेला नसून नॅशनल हेरॉल्डशी संबंधित कोणत्याही संचालकाला लाभांश अथवा पैसे मिळालेले नाहीत.

इंग्रज सरकारने या वृत्तपत्रावर १९४२ ते १९४५ दरम्यान बंदी घातली होती. स्वातंत्र्यानंतरही लोकशाही, संविधान व काँग्रेसचा विचार पुढे चालू ठेवण्यासाठी हे वर्तमानपत्र तोट्यात असतानाही चालूच ठेवले होते. या वर्तमानपत्रातील पत्रकार, कर्मचारी यांचा पगार देता यावा यासाठी काँग्रेस पक्षाने नॅशनल हेराल्डला २००२ ते २०११ दरम्यान ९० कोटी रुपये १०० हप्त्यात कर्जाने दिले. अशा प्रकारे कर्ज देणे कोणत्याही कायद्याखाली बेकायदेशीर नाही. हा सर्व व्यवहार पूर्ण पारदर्शक आहे. यात कसल्याही प्रकारच्या चल-अचल संपत्तीचे हस्तांतरण झालेले नाही व कोणालाही लाभ झालेला नसताना मनी लाँडरिंगचा गुन्हा कसा होतो, असा सवाल लोंढे यांनी उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com