Congress President : राहुल गांधी, गेहलोत यांच्या नकारानंतर अध्यक्षपदासाठी वासनिक यांचे नाव आघाडीवर

Congress President : काँग्रेस अध्यक्षपदासाठी प्लॅन बी वर काम सुरु आहे. अशोक गेहलोत यांनी नकार दिल्यानंतर आता मुकुल वासनिक यांना कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्यासाठी पुढे केले जाऊ शकते.
Mukul Wasnik
Mukul WasnikSarkarnama

नवी दिल्ली : कॉंग्रेसचे अध्यक्ष कोण होणार, याबाबत अनेक दिवसापासून चर्चा सुरु आहे. कॉंग्रेसचे अध्यक्षपदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव आघाडी आहे. पण त्यांनी हे पद स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यानंतर मुकुल वासनिक (mukul wasnik) यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. (Congress President latest news)

या सर्व घडामोडींवर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांना मध्यप्रदेश प्रभारी महासचिव पदावरुन मुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या जागी ज्येष्ठ नेते जेपी अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे महासचिव वेणुगोपाल यांच्याकडून ही माहिती देण्यात आली आहे.

"सोनिया गांधी यांनी मुकुल वासनिक यांना मध्यप्रदेश प्रभारी महासचिव पदावरुन मुक्त केले आहे. वासनिक यांच्यावर अन्य मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे. ते महासचिव असतील. त्यांनी मध्यप्रदेशात केलेले काम कौतुकास्पद आहे,"असे वेणुगोपाल यांनी म्हटलं आहे.

Mukul Wasnik
Ajit Pawar : बारामतीतील लोकांना माहिती आहे, कुठले बटन दाबायचे ; अजितदादांचा भाजपला टोला

काँग्रेस अध्यक्षपदासाठी प्लॅन बी वर काम सुरु आहे. अशोक गेहलोत यांनी नकार दिल्यानंतर आता मुकुल वासनिक यांना कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्यासाठी पुढे केले जाऊ शकते. त्यांच्याकडे पक्षाचे महासचिवपद देखील केले जाऊ शकते. सध्या हे पद राहुल गांधी यांचे निकटवर्तीय केसी वेणुगोपाल यांच्याकडे आहे.

मुकुल वासनिक यांच्याकडे पक्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. एनएसयूआईमधून त्यांनी आपला राजकीय प्रवासाला सुरवात केली आहे. काँग्रेसमधील नाराज गट (जी-२३)मधील ते प्रमुख नेते आहेत. त्यांनी याबाबत सोनिया गांधी यांना २०१९ मध्ये पत्र लिहिले होते. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर मुकुल वासनिक हे अनेक नेत्यांचे आवडते नेते आहेत, ते अध्यक्ष झाले असते पण काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत सोनिया गांधी यांची निवड करण्यात आली. आता वासनिक त्यांच्या नावाला अडचण येऊ शकणार नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com