Congress President Election : शशी थरुरांनी मौन सोडलं ; म्हणाले, "मी नाराज नाही, बड्या नेत्यांनी.."

Shashi Tharoor : काँग्रेसचे बडे नेते त्यांच्यासोबत होते. पक्षाचे सदस्य दोघांपैकी एकाला समर्थन देतील, यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही,"
Shashi Tharoor
Shashi Tharoorsarkarnama

Shashi Tharoor : काँग्रेस अध्यक्षपदाची (Congress President Election) निवडणुकीत शशी थरुर यांचा पराभव झाला आहे. मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) विजयी झाले आहेत.थरुर यांचा पराभव झाला असला तरी त्यांच्या नावावर एक नवीन कामगिरी नोंदवण्यात आली आहे. या कामगिरीनं शशी थरुर यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. या निवडणुकीत खर्गेंना 7 हजार 897 मते मिळाली, तर थरुर यांना केवळ 1 हजार 72 मते मिळली. थरुर यांना मिळालेली मते ही गेल्या 25 वर्षात हरलेल्या उमेदवाराला मिळालेली सर्वाधिक मते आहेत.

पराभवामुळे शशी थरुर नाराज असल्याची चर्चा कॉंग्रेसच्या गोटात सुरु आहे. यावर शशी थरुर यांनी भाष्य केले आहे. ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, "निवडणुकीतील पराभवामुळे मी नाराज नाही. खर्गे अध्यक्ष होणार हे निवडणुकीच्या सुरवातीपासून हे स्पष्ट झाले होते. काँग्रेसचे बडे नेते त्यांच्यासोबत होते. पक्षाचे सदस्य दोघांपैकी एकाला समर्थन देतील, यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही,"

Shashi Tharoor
Sanjay Raut यांची दिवाळीसुद्धा कारागृहात ; न्यायाधीशांनी पोलिसांचे कान उपटले !

काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर काल (गुरुवारी) मल्लिकाअर्जुन खर्गे यांनी समाजमाध्यमावर आपल्या वैयक्तीक माहितीमध्ये बदल केला आहे. त्यांनी टि्वटमध्ये "अध्यक्ष-इंडियन नेशनल कांग्रेस' (President: INC)" असा बदल केला आहे.

बुधवारी झालेल्या या निवडणुकीत खर्गेंना 7 हजार 897 मते मिळाली, तर थरुर यांना केवळ 1 हजार 72 मते मिळली. थरुर यांना मिळालेली मते ही गेल्या 25 वर्षात हरलेल्या उमेदवाराला मिळालेली सर्वाधिक मते आहेत.

शशी थरुर जरी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत वियजी झाले नसले तरी त्यांनी एक नवीन कामगिरी केली आहे. या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत थरुर यांना 1 हजार 72 मते मिळली आहेत. गेल्या 25 वर्षात पराभूत उमेदवाराला मिळालेली ही सर्वाधिक मते आहेत. थरुर यांना एकूण मतांपैकी 11.95 टक्के मते मिळाली आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकूण 9, हजार 385 मते पडली होती. त्यापैकी 8 हजार 969 मते वैध मानण्यात आली होती. यामध्ये खर्गेंना 7 हजार 897 मते मिळाली तर थरुर यांना 1 हजार 72 मते मिळली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in