
नवी दिल्ली : सध्या कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूक (congress president election) तयारीने जोर धरला आहे. बैठका होत आहेत, अशातच नवीन बातमी समोर येत आहे. कॉंग्रेसमधील दोन ज्येष्ठ नेत्यांनी तासभर बैठक झाली. हे दोन्ही नेते अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याने या बैठकीकडे सगळ्याचे लक्ष होते. या दोन्ही नेत्यांमध्ये कॉंग्रेसची पुढची वाटचाल आणि अध्यक्षपदाची निवडणूक याबाबत चर्चा झाल्याचे समजते. (congress president election news update)
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशि थरुर यांनी काल (रविवारी) राजस्थानचे मुखमंत्री अशोक गेहलोत यांची जोधपुर हाऊस येथे भेट घेतली. तासभर ही बैठक सुरु होती.
कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे नाव राजस्थानमधून पुढे आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी सचिन पायलट यांचे नाव चर्चेत आहे.
गेल्या काही दिवसापासून गेहलोत यांचे नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे, मात्र त्यांनी याबाबत नकार दिला आहे. राहुल गांधी यांना अध्यक्षपदासाठी तयार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शशि थरुर म्हणाले, "निवडणुकीची अधिसूचना निघाल्यावर अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरायचे की नाही हे ठरविणार आहे," काल झालेल्या रामलिला मैदानातील काँग्रेसच्या आंदोलना थरुर व गेहलोत दोन्ही नेते उपस्थित होते. त्यानंतर राहुल गांधीच्या भाषणाचे कौतुक करण्याबाबत थरुर यांनी टि्वट केलं होते.
कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक आणि गहलोत यांना हे पद देण्याविषयी उत्सुक नसलेल्या काही व्यक्तींबाबत पायलट यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, “राजकारणात जे दिसते ते घडत नाही, जे घडते ते दिसत नाही.” या संदर्भात ७१ वर्षीय गहलोत हे मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस प्रमुख अशी दोन्ही पदं आपल्याकडे ठेवतील असे संकेत त्यांच्या बोलण्यातून मिळाले. “मी तुमच्या नजरेच्या टप्प्यात असेन. मी तुमच्यापासून दूर जाणार नाही, असे अनेकदा सांगत आलो आहे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राज्यापासून दूर जाणार नाही. मग जबाबदारी कोणतीही असो,”
या निवडणुकीमध्ये राहूल गांधी हे अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार असणार आहेत.सध्या सोनिया गांधी या कॉंग्रेसच्या अध्यक्षा आहेत. मात्र प्रकृती आणि इतर कारणांनी त्या अनेक दिवसा पासून राजकारणातून दूर आहेत, तर कॉंग्रेस पक्षाच्या त्या गेल्या 19 वर्षांपासून अध्यक्ष आहेत. कॉंग्रेस अध्यक्षाची निवड 2015 पर्यंत होणे अपेक्षित होते, परंतु काही कारणांमुळे या प्रक्रियेला वेळ लागला. निवडणूक आयोगाने हस्तक्षेप करुन अध्यक्षाची पुन्हा निवड करण्यात यावी असे सांगितले आहे. यावेळी मात्र सोनिया गांधी एक प्रकारे निवृत्त होतील आणि राहुल सूत्रे हातात घेतील मात्र ऐनवेळी प्रियांका गांधी यांचे सुद्धा नाव येण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.त्यामुळे नवीन अध्यक्ष कॉंग्रेस पक्षात पुन्हा जोश आणेल का हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.