Congress President Election : ..तर सचिन पायलट राजस्थानचे मुख्यमंत्री होतील ; काय आहे राजकीय समीकरण ?

Congress President Election : २२ वर्षांनंतर काँग्रेसमध्ये अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे.
 sachin pilot, Ashok Gehlot
sachin pilot, Ashok Gehlotsarkarnama

पुणे : कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया (congress president election) सुरु झाली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि ज्येष्ठ नेते शशी थरुर हे निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. गेहलोत अध्यक्ष झाले तर राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार, याची चर्चा सध्या राजकीय विश्लेषकांमध्ये आहे. (congress president election latest news)

अशोक गेहलोत आणि शशी थरुर याच्याशिवाय मुकुल वासनिक यांचेही नाव उमेदवारांच्या नावामध्ये आघाडीवर आहे. अन्य काही जण देखील निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. अध्यक्षपदाची निवडणूक टाळून राहुल गांधी यांना अध्यक्ष करण्यासाठी कॉंग्रेसमधील अनेक नेते राहुल गांधींची मनधरणी करीत आहे, पण अध्यक्षपद न स्वीकारण्याच्या भूमिकेवर राहुल गांधी हे ठाम आहेत.

 sachin pilot, Ashok Gehlot
Congress President Election : काँग्रेसमध्ये अध्यक्षपदासाठी २२ वर्षांनंतर निवडणूक, अधिसूचना जारी

अशोक गेहलोत मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार नसून अध्यक्षपद आणि मुख्यमंत्रीपद अशी दोन्ही पदे त्यांना हवी आहेत. पण गेहलोत अध्यक्ष झाले तर त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद राहणार नाही, अशी चर्चा कॉंग्रेसच्या गोटात आहे. दुसरीकडे आपल्या मर्जीतील व्यक्तीला मुख्यमंत्रीपदी विराजमान करुन अध्यक्षपदाची धुरा सांभाळावी, अशी योजना अशोक गेहलोत यांची आहे.

गेहलोत यांच्या मर्जीतील व्यक्ती मुख्यमंत्री होणार नाही, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे, कारण पुढच्या वर्षी राजस्थानमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता मुख्यमंत्रीपदाची माळ सचिन पायलट यांच्या गळ्यात पडण्याची दाट शक्यता आहे.

गेहलोत यांच्या मर्जीतील व्यक्तीला मुख्यमंत्री केले तर पायलट गटातील नाराजीचा फटका विधानसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे टाळण्यासाठी कॉंग्रेस पक्षश्रेष्ठी गेहलोत यांच्या मर्जीतील व्यक्तीला मुख्यमंत्री करण्याचे धाडस करणार नाही,अशी चर्चा समाजमाध्यमांवर रंगल्या आहेत.

शशी थरुर आणि अशोक गेहलोत हे दोन्ही जण निवडणुकीच्या रिंगणात उतरतील, असे चित्र सध्या आहे. काल अशोक गेहलोत यांनी काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. यापूर्वी शशी थरुर यांनीही सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. हे दोन्ही नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर २२ वर्षांनंतर काँग्रेसमध्ये अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in