काँग्रेसची लोकसभेच्या पोटनिवडणुकीतून माघार; एकाही जागेवर नसेल उमेदवार

विधासनभा निवडणुकीत काँग्रेसला उत्तर प्रदेशात केवळ दोन जागा मिळाल्या आहेत.
Congress party Latest Marathi News, Political News Updates in Marathi
Congress party Latest Marathi News, Political News Updates in MarathiSarkarnama

लखनौ : उत्तर प्रदेशातील काही दिवसांपूर्वीच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. त्यानंतर आता लोकसभेच्या पोटनिवडणुकीतही पक्षाने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता आझमगड व रामपूर या मतदारसंघात समाजवादी पक्ष आणि भाजपमध्येच थेट लढत होणार आहे. (Congress Latest Marathi News)

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे केवळ दोन उमेदवार विजयी झाले आहेत. तसेच उत्तराखंड, गोवा, पंजाब व मणिपूरमध्येही पक्षाचा पराभव झाला. या धक्क्यातून अद्याप पक्ष सावरला नाही. पराभवानंतर या राज्यांतील प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे घेण्यात आले. पण अजूनही उत्तर प्रदेश काँग्रेसला नवे अध्यक्ष मिळाले नाहीत.

Congress party Latest Marathi News, Political News Updates in Marathi
अखिलेश यांनी पत्नीलाच घरी बसवलं; लोकसभेच्या निवडणुकीत चुलत भावाला झुकतं माप

नेतृत्व नसलेल्या उत्तर प्रदेशात काँग्रेसने आता लोकसभा निवडणुकीतूनही माघार घेतली आहे. दोन्ही मतदारसंघात उमेदवार न देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. पक्षाच्या पराभवातून सावरत असताना 2024 च्या निवडणुकीसाठी पक्ष संघटन मजबूर करण्यावर आधी भर दिला जात असल्याचे नेत्यांकडून सांगितले जात आहे.

डिंपल यादव यांना बसवलं घरी

समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी राज्यसभेपाठोपाठ लोकसभेच्या पोटनिवडणुकीतही पत्नी डिंपल यांना उमेदवारी नाकारली आहे. त्यांच्याऐवजी अखिलेश यांनी चुलत भाऊ व माजी खासदार धर्मेंद्र यादव यांना संधी दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

अखिलेश यादव आणि आझम खान यांनी विधानसभा निवडणुकीत विजयानंतर खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे अनुक्रमे आझमगड आणि रामपूर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. त्याआधी डिंपल यादव यांची राज्यसभेची मुदत संपत असल्याने त्यांना पुन्हा राज्यसभेत पाठवले जाईल, अशी शक्यता होती. पण त्यांच्याजागी अखिलेश यांनी सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रील लोक दलाचे (RLD) प्रमुख जयंत चौधरी (Jayant Chaudhary) यांना उमेदवारी दिली.

Congress party Latest Marathi News, Political News Updates in Marathi
...तर शेवटच्या पाच मिनिटांत मतदान मारणार! बच्चू कडूंनी वाढवलं शिवसेनेचं टेन्शन

त्यानंतर आता लोकसभेची पोटनिवडणूक होणार असल्याने अखिलेश हे डिंपल यांना आझमगढ किंवा रामपूर मतदारसंघात तिकीट देतील, असा अंदाज वर्तविली जात होता. पण इथेही अखिलेश यांनी राजकीय खेळी करत पक्षाचे बडे नेते आमदार आझम खान यांच्या पत्नी तंजीम फातिमा यांना रामपूर मतदारसंघातून उतरवलं आहे. तर आझमगढ मतदारसंघात चुलत भाऊ धर्मेंद्र यादव यांना तिकीट दिलं आहे. धर्मेंद्र हे याआधी बदायू मतदारसंघाचे खासदार होते. पण 2019 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. या दोन्ही जागांसाठी 23 जून रोजी मतदान होणार असून 26 जून रोजी निकाल लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com