Rahul Gandhi News: राहुल गांधींची खासदारकी संकटात? पुढची 6 वर्षे निवडणूक लढवू शकणार नाहीत? कायदेशीर तरतुदी काय...

Rahul Gandhi News : राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा
Rahul Gandhi News
Rahul Gandhi NewsSarkarnama

Congress News: निवडणुकीच्या प्रचार सभेत केलेल्या, एका वक्तव्या प्रकरणी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना गुजरातच्या (Gujarat) सत्र न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. मात्र, यामुळे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द होणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

न्यायालयाने राहुल गांधींना जामीन दिला असला, तरी दोन वर्षांच्या शिक्षेमुळे त्यांच्या लोकसभा सदस्यत्वावरील संकट गडद झाले आहे. उच्च न्यायालयाने राहुल गांधींना दिलासा दिला नाही, तर त्यांना खासदारकी गमवावी लागू शकते, अशी चर्चा सध्या सुरू आहे. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, खासदार आणि आमदारांना 2 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाली असेल, तर त्यांचे सदस्यत्व (संसद आणि विधानसभेतून) रद्द केले जाईल. शिक्षेचा कालावधी पूर्ण केल्यानंतर ते सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यासही अपात्र ठरतील, अशी तरतूद आहे.

Rahul Gandhi News
Rahul Gandhi : राहुल गांधींविरुद्धचा निकाल भाजपच्या कपटी षडयंत्राचा भाग; काँग्रेसचा आरोप

2019 मध्ये राहुल यांनी कर्नाटकातील एका सभेत एक वक्तव्य केले होते. यामध्ये त्यांनी 'सर्व चोरांचे आडनाव मोदीच का असते?' असा सवाल केला होता. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यामुळे भाजप (BJP) आमदार पूर्णेश मोदी यांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. सुरतच्या सत्र न्यायालयाने आज राहुल गांधींना दोषी ठरवत 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर राहुल यांना न्यायालयाने लगेचच 30 दिवसांचा जामीनही दिला.

राहुल गांधींची खासदारकी जाणार का?

सुरतच्या सत्र न्यायालयाच्या निर्णयाची प्रत प्रशासनाने लोकसभा सचिवालयाला पाठवली, तर लोकसभा अध्यक्षांनी ती स्वीकारताच राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व संपुष्टात येईल. राहुल गांधी यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असून, त्यानंतर ते 6 वर्षे निवडणूक लढवू शकणार नाहीत. अशाप्रकारे काँग्रेस (Congress) राहुल गांधी यांना एकूण 8 वर्षे कोणतीही निवडणूक लढवता येणार नसल्याचेही बोलले जात आहे.

Rahul Gandhi News
Uddhav Thackeray : ठाकरे-फडणवीस शंभर पाऊलच एकत्र चालले; पण इशारा कुणाला, शिंदेंना की आघाडीला?

राहुल गांधी यांचे सदस्यत्व कायम ठेवण्याचे सर्व मार्ग बंद झालेले नाहीत. ते त्यांच्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतात. जेथे सुरत सत्र न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती मिळाली तर त्यांच्या खासदारकीला कोणताही धोका नाही. उच्च न्यायालयाने स्थगिती दिली नाही, तर त्यांना सर्वोच्च न्यायालयात जावे लागेल. सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली तरी त्यांची खासदारकी वाचू शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com