नेहरू-गांधींच्या नावावर आम्ही तीन पिढ्या बसून खातील एवढं कमावलं! काँग्रेस आमदाराची कबुली

रमेश कुमार यांनी अनेकदा वादग्रस्त विधानं केली आहेत.
Congress MLA Ramesh Kumar
Congress MLA Ramesh KumarSarkarnama

बेंगलुरू : वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत वादात अडकणारे काँग्रेसचे आमदार आणि कर्नाटक (Karnataka) विधानसभेचे माजी अध्यक्ष के. आर. रमेश कुमार यांनी पुन्हा वाद निर्माण केला आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी नेहरू आणि गांधी यांच्या नावावर खुप कमावलं आहे. आमच्या तीन-चार पिढ्यांसाठी ते खूप आहे, असं वक्तव्य केलं आहे. (Congress Latest Marathi News)

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या ईडी चौकशीविरोधात बेंगलुरू येथे गुरूवारी पक्षाकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना रमेश कुमार यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, आम्ही नेहरू, इंदिरा गांधी आणि सोनिया गांधी यांच्या नावावर एवढी संपत्ती कमावली आहे की जी तीन ते चार पिढ्यांना पुरेल. आज आम्ही बलिदान दिलं नाही तर भविष्यात आम्ही कमवलेलं सडून जाईल.

Congress MLA Ramesh Kumar
..म्हणून त्यांच्या पोटात दुखतयं; आदित्य ठाकरेंनी केली बंडखोरांची पोलखोल

पक्षातील कार्यकर्त्यांनी पक्षातून छोटे-छोटे मुद्दे सोडून काँग्रेस आणि सोनिया गांधी यांना मजबूत करण्यासाठी काम करायला हवे, असंही रमेश कुमार म्हणाले आहेत. यावरून आता भाजपकडून काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला जाऊ शकतो. भाजपकडून काँग्रेसवर सतत भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात. याप्रकरणात काँग्रेसचे नेतेही कुमार यांच्या पाठिशी उभे राहणार नाहीत, अशी शक्यता आहे.

दरम्यान, रमेश कुमार यांनी यापूर्वीही अनेकदा वादग्रस्त विधानं केली आहेत. डिसेंबर महिन्यात राज्य विधानसभेत शेतकऱ्यांच्या मुद्यावर चर्चेदरम्यान अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे यांनी वेळेत कमी असल्याने प्रत्येकाला बोलण्यासाठी वेळे नियोजन कसं करता येईल, असा प्रश्न विचारला होता. तुम्ही जे निश्चित कराल त्याला मी हो म्हणेन. मी जो विचार करतोय ते हे आहे की, आपण या स्थितीचा आनंद घ्यावा, असं ते म्हणाले होते.

Congress MLA Ramesh Kumar
Kolhapur Politics: बंडखोरांना रोखण्यासाठी पवारांचा मास्टर प्लॅन; मुश्रीफांना दिल्या सूचना

त्यावर बोलताना रमेश कुमारे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, 'एक म्हण आहे, जेव्हा बलात्कार होणारच असतो तेव्हा झोपा आणि त्याचा आनंद घ्या. अशीच तुमची अवस्था झाली आहे.' त्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com