काँग्रेसचा आमदार घसरला कंगनाच्या गालावर अन् व्हिडीओ झाला व्हायरल!

काँग्रेसच्या आमदाराचे रस्ते कंगना राणावतच्या गालासारखे गुळगुळीत करून दाखवण्याचे आश्वासन व्हायरल झाले आहे.
Kangana Ranaut and Irfan Ansari
Kangana Ranaut and Irfan AnsariSarkarnama

नवी दिल्ली : शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना आपल्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनी (Hema Malini) यांच्या गालासारखे आहेत, असे वक्तव्य केल्याने गदारोळ उडाला होता. आता काँग्रेसच्या (Congress) आमदाराने मतदारसंघातील रस्ते कंगना राणावतच्या (Kangana Ranaut) गालासारखे गुळगुळीत करून दाखवण्याचे आश्वासन जाहीरपणे दिले आहे. याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, यावरून वाद निर्माण झाला आहे.

खूप वर्षांपूर्वी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव (Lalu prasad yadav) बिहारमधील रस्ते हेमा मालिनी यांच्या गालासारखे असल्याचे म्हणत होते. मात्र, त्यांचीच स्टाईल मारत अनेक नेत्यांनी रस्त्यांची तुलना हेमा मालिनी यांच्या गालाशी करण्याची परंपरा कायम ठेवली होती. यात नुकतीच गुलाबराव पाटील यांची भर पडली होती. या प्रकरणी पाटील यांनी अखेर माफी मागावी लागली होती.

Kangana Ranaut and Irfan Ansari
गर्दी राजकीय पक्षाची अन् आयोगाचा पोलीस अधिकाऱ्याला दणका; तातडीनं केलं निलंबित

आता काँग्रेस आमदाराने रस्त्यांसाठी हेमा मालिनी यांच्याऐवजी कंगना राणावतच्या गालाची उपमा देऊन नवीन वाद ओढवून घेतला आहे. झारखंडमधील जमताराचे आमदार डॉ.इरफान अन्सारी यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, जमतारामधील रस्ते चित्रपट अभिनेत्री कंगना राणावतच्या गालापेक्षा मी गुळगुळीत करून दाखवेन. लवकरच मतदारसंघात जागतिक दर्जाचे 14 रस्ते बनवण्यात येतील.

Kangana Ranaut and Irfan Ansari
कारमध्ये आता 6 एअरबॅग बंधनकारक; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा मोठा निर्णय

गुलाबराव पाटील यांनी नुकतीच बोदवड नगरपंचायत प्रचार भरसभेत बोलताना हेमा मालिंनीबाबत वक्तव्य केले होते. गेली ३० वर्षे या भागातले आमदार आहेत. पण ते साधे रस्ते चांगले करू शकले नाहीत. माझ्या धरणगाव मतदारसंघात या आणि बघा हेमा मालिनी यांच्या गालासारखे सुंदर रस्ते आम्ही केले आहेत, असे पाटीला म्हणाले होते. या वक्तव्याची क्लिप व्हायरल झाल्यानंतर गुलाबराव पाटील चांगलेच वादात सापडले होते. या प्रकरणी अखेर माफीनामा सादर करून पाटील यांनी वादावर पडदा टाकला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in