DK Shivakumar News : कर्नाटकचा तिढा कायम; डी. के. शिवकुमारांनी पक्षासमोर ठेवली 'ही' अट

Congress News : कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला ऐतिहासिक विजय मिळाला आहे.
D. K. Shivakumar
D. K. ShivakumarSarkarnama

Karnataka News : कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. मात्र, मुख्यमंत्री पदावरुन दिल्लीमध्ये बैठकांचे सत्र सुरु आहे. मुख्यमंत्री पदासाठी डि. के. शिवकुमार आणि ज्येष्ट नेते सिद्धारामैय्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरु आहे.

चार दिवसांपासून काँग्रेस (Congress) हायकमांडच्या बैठका सुरु आहेत. मात्र, त्यामध्ये कोणताही तोडगा निघालेला नाही. दोन्ही नेते मुख्यमंत्रिपदावर ठाम आहेत. यात अडीच-अडीच वर्षांच्या फॉर्म्युयाची चर्चा होत आहे. मात्र, शिवकमार यांनी पक्षासमोर एक अट ठेवली आहे, अशी सूत्रांची माहीत आहे.

D. K. Shivakumar
Prakash Ambedkar News : ठाकरेंचा मास्टर प्लॅन; मुंबईतून प्रकाश आंबेडकरांना लढवणार? पण आंबेडकर म्हणतात...

शिवकुमार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. तर सिद्धारामैय्या हे ज्येष्ट नेते आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री पदावर दोघांचीही दावेदारी आहे. मीडिया रिपोर्ट नुसार पक्षाने शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपदासह महत्त्वाची खाती देऊ केली आहेत. पण, शिवकुमार यावर समाधानी नाहीत. यातच अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा पुढे आली आहे. मात्र, शिवकुमार यांनी पहिले अडीच वर्ष त्यांना मुख्यमंत्रीपद देण्याची मागणी केली आहे.

D. K. Shivakumar
Ncp News : राष्ट्रवादीचं ठरलं : आमदार शेळके अन् तुपेंवर पुण्याची जबाबदारी; मुंडे, खडसे, तटकरे आणि देशमुखांकडे 'हे' विभाग

शिवकुमार यांनी हायकमांडला स्पष्टपणे सांगितले आहे की, त्यांना मुख्यमंत्रिपदाशिवाय दुसरं काहीही नको आहे. पहिल्या अडिच वर्षांचा कार्यकाळ मला द्यावा तर दुसरा सिद्धरामैय्या यांना द्यावा, अशी अट त्यांनी हायकमांडसमोर ठेवली आहे. शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री पदासाठी स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे आता काँग्रेस काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com