Belgaum News : बंडखोरीमुळे काँग्रेसचा बेळगावमध्ये दोन जागांवर पराभव

पक्षाला एकहाती सत्ता मिळाली असली तरी यात आणखी २ जागा या बेळगाव जिल्ह्यामधून पक्षाला मिळाल्या असत्या अशी चर्चा वर्तुळात आहेत.
 Congress
CongressSarkarnama

बेळगाव : जयनगर येथील विधानसभा मतदार संघात झालेल्या फेरमतमोजणीमध्ये कॉंग्रेस उमेदवाराने अवघ्या सोळा मतांनी गमाविल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. मात्र, बेळगावात जिल्ह्यात बंडखोरीमुळे कॉंग्रेसच्या दोन जागा कमी झाल्या आहेत. त्याची आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे. (Congress lost two seats in Belgaum due to insurgency)

जगनगरला पहिल्यांदा रेड्डी यांचा ३६० मतांनी विजय झाल्याचे घोषित करण्यात आले होते. मात्र, येथे नंतर झालेल्या फेरमतमोजणीत १६ मतांनी त्यांचा पराभव झाल्याची घोषणा करण्यात आली. यामुळे १३६ जागा काँग्रेसला मिळाल्याची घोषणा केली होती. नंतर १३५ जागांची घोषणा कॉंग्रेसकडून करण्यात आली.

 Congress
Karnataka Next CM : मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये आणखी एका काँग्रेस नेत्याची उडी : म्हणाले, ‘मी ५० आमदार घेऊन लॉबिंग करू शकतो...’

पक्षाला एकहाती सत्ता मिळाली असली तरी यात आणखी २ जागा या बेळगाव जिल्ह्यामधून पक्षाला मिळाल्या असत्या अशी चर्चा वर्तुळात आहेत. बंडखोरी होऊन मतांची विभागणी झाल्यामुळे निपाणी आणि रायबागला कॉंग्रेस उमेदवारांचा पराभव झाला आहे. तिरंगी लढतीचा फटका बसला आणि कॉंग्रेस उमेदवारांचा पराभव झाला आहे.

निपाणी विधानसभा मतदार संघातून भाजप उमेदवार शशिकला जोल्ले विजयी झाल्या. त्यांनी ७७,९५२ मते घेतले. प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार उत्तम पाटील यांना ६६,६१४ मते पडली. कॉंग्रेस उमेदवार काकासाहेब पाटील यांना ४३,९३२ मते पडली. त्यामुळे जोल्ले यांनी ११ हजार ३३८ मताधिक्यांनी विजय मिळविला. मुळात उत्तम पाटील यांनी कॉंग्रेसकडे उमेदवारीची मागणी केली होती. पक्षाने काकासाहेब पाटील यांना उमेदवारी दिली. बंडखोरीमुळे मत विभागणी झाली. बंडखोरी थोपविता आली असती तर कॉंग्रेसला सहज विजय मिळविणे शक्य होते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

 Congress
Karnataka Result : कर्नाटक निकालाने भाजपत खळबळ : हायकमांडने काढले सर्व राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांना खासदारांबाबत हे फर्मान!

रायबागला आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी २,६३१ मताधिक्यांनी विजय मिळविला आहे. ऐहोळे यांना ५७,१६४ मते पडली. तर प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार शंभू कल्लोळकर यांनी ५४,५३३ मते घेतली. कॉंग्रेस उमेदवार महावीर मोहिते यांना २२,५५० मतदान झाले. कल्लोळकरांनी कॉंग्रेसकडे उमेदवारीची मागणी केली होती. पण, पक्षाने मोहिते यांना उमेदवारी दिली. याठिकाणी उमेदवारीत बदल किंवा बंडखोरी थोपवून कल्लोळकर यांचा पाठिंबा मिळविला असता तर कॉंग्रेस येथून झेंडा फडकवू शकला असता, अशी चर्चा कार्यकर्त्यांत आहे.

 Congress
Karnataka Next CM : कर्नाटकच्या राजकारणात पुन्हा ट्विस्ट : ‘लोकसभेला आमची मते हवी असतील, तर मुख्यमंत्री...’

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसची लाट होती. निपाणी, रायबागलाही तसे संकेत मिळत होते. मात्र, पक्षपातळीवर त्याचा कानोसा घेऊन योग्य उमेदवार निवडणे शक्य झाले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in