भाजपच्या झंझावातामध्ये काँग्रेसचा पालापाचोळा : ६९० जागांपैकी अवघ्या ५३ ठिकाणी यश

BJP | AAP | Congress | TMC | 5 States Election update : काँग्रेसचा दारुण पराभव
भाजपच्या झंझावातामध्ये काँग्रेसचा पालापाचोळा : ६९० जागांपैकी अवघ्या ५३ ठिकाणी यश
Congress-BJPSarkarnama

दिल्ली : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब. ५ राज्यांच्या हाती आलेल्या निकालांमध्ये भाजप आणि आम आदमी पक्षाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. ५ पैकी उत्तराखंड, उत्तरप्रदेश, गोवा आणि मणिपूर या ४ राज्यांमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने मोठा विजय संपादन केला आहे. या सगळ्यात काँग्रेस मात्र सारीपाटाच्या बाहेरच फेकली गेली आहे. पंजाबमधील काँग्रेसची सत्ता उलथवून लावत आम आदमीने मुसंडी मारली. तर मणिपूर, उत्तराखंड, गोवा या ठिकाणी काँग्रेसच्या पदरी निराशा पडली आहे.

याशिवाय राहूल गांधी आणि प्रियांका यांनी सर्वात जास्त ताकद लावलेले राज्य म्हणजे उत्तर-प्रदेश. याठिकाणी काँग्रेसने 'लडकी हूँ लड सकती हूँ' असं म्हणतं संपूर्ण ताकदीनिशी प्रचार केला होता. मात्र त्याचा कोणताही उपयोग काँग्रेसला झाला नाही. ५ राज्यांत मिळून काँग्रेसला शंभरचा आकडा देखील पार करता आलेली नाही. काँग्रेस पंजाबमध्ये १८, उत्तराखंडमध्ये १८, उत्तरप्रदेशमध्ये २, मणिपूर ४ तर गोव्यात ११ जागांवर आघाडीवर आहे. सध्याच्या स्थितीनुसार स्थितीनुसार काँग्रेस ५३ जागांवर आघाडीवर आहे.

त्या तुलनेत भाजपने मात्र ४ राज्यांमध्ये घवघवीत यश मिळवलं आहे. भाजपला सध्या उत्तरप्रदेशमध्ये भाजपला २७३ जागांवर यश मिळताना दिसत आहे. तर गोव्यात २० जागांवर भाजपला यश मिळालं आहे. उत्तराखंडमध्ये ही भाजपला ७० पैकी ४८ जागा मिळाल्या आहेत. मणिपूरमध्ये देखील भाजपने यश मिळवलं असून ६० पेकी ३१ जागांवर भाजपने यश मिळवलं आहे. त्यामुळे आता ४ ही राज्यांमध्ये भाजप पुन्हा सत्ता स्थापन करणार आहे.

याशिवाय आम आदमी पक्षानेही पंजाबमध्ये मोठे उलटफेर केलेले पाहायला मिळत आहेत. आम आदमी पक्षाला पूर्ण बहुमत आकड्यासह तब्बल ९२ जागांवर विजयी मिळवला आहे. तर सत्ताधारी काँग्रेसला केवळ १८ जागांवर विजय मिळाला आहे. भाजपला अवघ्या २ जागांवर आघाडी घेता आली आहे. भाजपचा जुना साथीदार आणि एकेकाळचा सत्ताधारी असलेला शिरोमणी अकाली दल फक्त ०४ जागांवर यशस्वी होताना दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in