नाराज पायलट यांच्यासमोर काँग्रेस नेतृत्व नमले; प्रियांका गांधीही कायम संपर्कात

राजस्थानमधील काँग्रेस नेते सचिन पायलट हे पक्षाने दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याने नाराज आहेत. यावर अखेर पक्षाने नमती भूमिका घेतली आहे.
congress leadership is in touch with sachin pilot says ajay maken
congress leadership is in touch with sachin pilot says ajay maken

नवी दिल्ली : राजस्थानमधील (Rajasthan) काँग्रेस (Congress) नेते सचिन पायलट (Sachin Pilot) हे पक्षाने दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याने  नाराज आहेत. यामुळे त्यांनी नुकताच दिल्ली दौरा केला होता. परंतु, पक्षश्रेष्ठींनी त्यांना भेट देणे टाळल्याने पायलट राजस्थानला परतले होते. आता काँग्रेसच्या नेतृत्वाने पायलट यांच्यासमोर नमती भूमिका घेतली आहे. पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यासुद्धा पायलट यांच्या कायम संपर्कात आहेत. 

सचिन पायलट हे 11 जूनला सायंकाळी दिल्लीत दाखल झाले होते. पक्षाच्या नेतृत्वाची ते भेट घेणार होते. पायलट यांनी मागील वर्षी केलेल्या बंडावेळी पक्षाने दिलेली अनेक आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. यातच जितिन प्रसाद यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने पायलट यांनी पक्षाला पुन्हा एकदा इशारा दिला होता. पक्ष कायम आपल्याला गृहित धरु शकत नाही, असा गर्भित इशाराही पायलट यांनी दिला होता. परंतु, पक्षश्रेष्ठींची भेट न घेताच पायलट हे दिल्लीतून पाच दिवसांनंतर राजस्थानला परतले होते. 

यामुळे पायलट यांना भेट देण्याची तसदीही पक्ष नेतृत्वाने घेतली नाही, अशा चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर राजस्थानचे प्रभारी अजय माकन म्हणाले की, पायलट यांनी पक्ष नेतृत्वाची भेटीसाठी वेळ मागितली आणि त्यांना ती मिळाली नाही, असे घडणे शक्यच नाही. मागचे 10 दिवस प्रियांका गांधी या दिल्लीत नव्हत्या. त्यामुळे त्या पायलट यांना भेटू शकल्या नाहीत मात्र, त्या सातत्याने पायलट यांच्या संपर्कात आहेत. याचबरोबर पक्षाचे नेते के.सी.वेणूगोपाल हेसुद्धा पायलट यांच्याशी संवाद साधत आहेत. 

मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल बोलताना अजय माकन म्हणाले की, सध्या राजस्थानमधील मंत्रिमंडळात नऊ रिक्त जागा आहेत. याचबरोबर अनेक महामंडळांवरील नियुक्त्याही व्हायच्या आहेत. या रिकाम्या जागी नियुक्त्या करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, सचिन पायलट, सी.पी.जोशी आणि मंत्रिमंडळातील सहकारी व नेत्यांच्या संपर्कात आहे. 

मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार यावर माकन म्हणाले की, आम्ही सर्व घटकांशी चर्चा करीत आहोत. मागील वर्षी राजस्थानमध्ये राजकीय संकट निर्माण झाले होते, हे सर्वांना माहिती आहे. सर्व घटकांना प्रतिनिधित्व मिळावे, असा आमचा प्रयत्न आहे. यात प्रादेशिक विभाग, पक्षातील ज्येष्ठत्व आणि जातीय समीकरणे यांचाही विचार केला जाईल. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com