प्रल्हाद जोशी यांनीच रचलं येडियुरप्पांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याचे षडयंत्र!

सिध्दरामय्या यांनी हे आरोप केले आहेत.
BS yediyurappa Latest News, Pralhad Joshi Latest News
BS yediyurappa Latest News, Pralhad Joshi Latest NewsSarkarnama

नवी दिल्ली : काँग्रेसचे (Congress) नेते सिध्दरामय्या यांनी सोमवारी भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जोशी यांनी बी. एस. येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्यासाठी जोशी यांनी षडयंत्र रचल्याचा दावा सिध्दरामय्या यांनी केला आहे. त्यामुळे कर्नाटकातील राजकारण पुन्हा तापलं आहे. (Karnataka BJP Latest News)

सिध्दरामय्या यांनी ट्विटरवरून जोशी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, चार दशके घाम गाळून येडियुरप्पा यांनी पक्ष उभा केला. पण त्यांना कुणी बाजूला सारले, कुणाच्या षडयंत्रामुळे ते तुरूंगात गेले आणि पक्ष सत्तेत असतानाही त्यांना कुणी मुख्यमंत्री पदावरून हटवलं, असे सवाल सिध्दरामय्या यांनी केले आहेत.

BS yediyurappa Latest News, Pralhad Joshi Latest News
माजी प्रदेशाध्यक्षांची भाजपला सोडचिठ्ठी; काँग्रेसमध्ये केला प्रवेश

येडियुरप्पा हे मुख्यमंत्री बनू इच्छित होते. पण त्यांच्यावर ऑपरेशन कमल कुणी केले, असा प्रश्न उपस्थित करत सिध्दरामय्या यांनी जोशी यांच्यावर निशाणा साधला. आमदार बसवनगौडा पाटील यतनाळ दररोज येडियुरप्पा आणि विजयेंद्र यांच्याविरोधात कुणी दंड थोपटले होते याचे आरोप करत आहेत. पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याविरोधात अपमानजनक बोलणाऱ्या आमदारांविरोधात कारवाई करण्यापासून कोण रोखत आहे प्रल्हाद जोशी, असं म्हणत सिध्दरामय्या यांनी पाटील यांनाही या वादात ओढलं आहे.

तुमच्या नशिबात बहूमत मिळवणे आणि त्यामाध्यमातून सत्तेत येणं लिहिलेलं नाही. तुम्ही काहीही म्हणा, ऑपरेशन कमळ हा एक वाईट धंदा आहे, अशी टीका सिध्दरामय्या यांनी केली आहे. सिध्दरामय्या यांनी एकामागोमाग एक ट्विट करत जोशी यांच्या हल्ला चढवल्याने कर्नाटकातील राजकारणात खळबळ उडाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in