बाकी केवळ संगीत खुर्ची..कितीही चेहरे बदलले तरी सरकार दीड माणसंच चालवणार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा मेगाविस्तार आज झाला. यात 43 मंत्र्यांचा शपथविधी झाला आहे.
congress leader sachin sawant slams modi government cabinet reshuffle
congress leader sachin sawant slams modi government cabinet reshuffle

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) मेगाविस्तार आज झाला. यात 43 मंत्र्यांचा शपथविधी झाला. याचबरोबर 12 मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे. यावरुन काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. कितीही चेहरे बदलले तरी सरकार केवळ दीड माणसे चालवतात, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. 

पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी मंत्रिमंडळ विस्तारासाठी आज बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि फेररचनेवर शिक्कामोर्तब झाले. राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात 43 मंत्र्यांचा शपथविधी झाला. पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या टर्ममधील हा पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार आहे. रामविलास पासवान आणि सुरेश अंगडी यांचे निधन आणि शिवसेना व अकाली दल हे पक्ष सरकारमधून बाहेर पडल्याने मंत्रिमंडळातील रिक्त जागा वाढल्या होत्या. 
 
यावरुन सचिन सावंत यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले आहे, त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, मोदींचा मंत्रीमंडळ विस्तार- आपल्या अभूतपूर्व अपयशाचे खापर फोडण्यासाठी काही अजून डोकी सामिल करत आहेत. डळमळीत अर्थव्यवस्था,आकाशाला भिडणारी महागाई, अपमानित होत असलेल्या महिला, बेरोजगारीने लाचार तरुण, आक्रोश करणारे शेतकरी, सीमेवर संकट झेलणारे सैनिक, दहशतवादाचे काश्मीरमध्ये वाढते संकट कोरोनाची तिसरी लाट आणि भयानक हाहाकाराचे सावट असे अनेक मुद्दे देशासमोर आहेत. असे असताना मंत्रिमंडळ विस्तार हा विषय निरर्थक यासाठी आहे की मुखवटे कितीही बदलले व अवडंबर केले तरी सत्य कसे लपणार?सत्य हेच आहे की हे सरकार केवळ दीड माणसं चालवत आहेत. एक मोदी आणि अर्धे अमित शाह!

बाकी केवळ संगीत खुर्ची! या मंत्र्यांना नाहीतरी ट्रोलींग शिवाय अधिक काम असणार नाही. त्यामुळे एक खुर्ची आणि अर्ध्या स्टूलवर बसलेल्या मोदी व शाहना आम्ही प्रश्न विचारत राहू. त्यांना आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी बोलायला, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविरूध्द लढण्याचे नियोजन करण्यास वेळ नाही. सर्वपक्षीय बैठक बोलावयाला वेळ नाही. पण दलबदलू व सत्तेसाठी हपापलेल्यांसाठी मंत्रीमंडळ विस्ताराचा खेळ अशा संकटकाळी मांडायला वेळ आहे हे स्पष्ट दिसून येते. हाच मोदी सरकारचा खरा चेहरा आहे. मोदी सरकारच्या सत्तेच्या खेळाशी जीवनमरणाचा संघर्ष करणाऱ्या सामान्य माणसाचे कोणतेही घेणंदेणं नाही, असे सावंत यांनी म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com