बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांना हाथरसच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून धमकी

हाथरसमधील बलात्कार प्रकरणावरुन देशभरात संतापाचे वातावरण आहे. या पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जाणाऱ्या विरोधी पक्षांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून बळाचा वापर करुन अडवण्यात येत आहे.
congress leader sachin pilot targets uttar pradesh government over hathras case
congress leader sachin pilot targets uttar pradesh government over hathras case

लखनौ : हाथरस येथील बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जाणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना अडविण्यात येत आहे. उत्तर प्रदेश पोलिसांना काँग्रेस नेते राहुल गांधी यांना धक्काबुक्की करुन अटक केल्यानंतर आता तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना धक्काबुक्की केली आहे. या प्रकरणी काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर हल्लाबोल केला आहे. पोलीस, प्रशासन आणि राज्य सरकारने जाणीवपूर्वक या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप पायलट यांनी केला आहे. 

हाथरसमधील 19 वर्षांत्या दलित युवतीवर पाच नराधमांनी सामूहिक बलात्कार केला होता. ही घटना दोन आठवड्यांपूर्वी घडली होती. नंतर उपचारादरम्यान दिल्लीतील रुग्णालयात त्या युवतीचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट पसरली आहे. यातच पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने त्या पीडितेच्या कुटुंबीयांना विश्वासात न घेता परस्पर तिच्यावर अंत्यसंस्कार केले होते. पोलिसांनी या प्रकरणी पुरावे नष्ट केल्याचा आरोप करण्यात येत आहे. 

हाथरस प्रकरणावरुन गदारोळ सुरू असताना काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी या प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. ते  म्हणाले की, पोलीस, प्रशासन आणि उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणातील पुरावे जाणीवपूर्वक नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. हाथरसच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना धमकावण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि सगळ्या प्रशासनाने विरोधी पक्षांचा आवाज दाबून टाकण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. 

या पिडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी कार्यकर्त्यांसह काल हाथरसकडे निघाले असता पोलिसांनी त्यांना अडवून धक्काबुक्की केली होती. या दोघांना अटक करण्यात आली होती. नंतर दोघांची पोलिसांनी सुटका केली. राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचे पडसाद देशभरात उमटले होते. अनेक ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली होती. 

तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे शिष्टमंडळ आज हाथरस बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जात होते. त्यावेळी त्यांना पोलिसांनी अडवून धक्काबुक्की केली. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता ठाकूर म्हणाल्या की, आम्ही पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जात असताना महिला पोलिसांनी आमचे कपडे फाडले आणि आमच्या नेत्या खासदार प्रतिमा मंडल यांच्यावर लाठीहल्ला केला. पुरुष पोलिसांनीही महिलांना धक्काबुक्की केली. ही घटना लाजीरवाणी आहे. 

पोलिसांनी डेरेक ओब्रायन यांना धक्काबुक्की करीत जमिनीवर पाडले. ते यात जखमी झाले आहेत. त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचा दावा तृणमूल नेत्या काकोली घोष दस्तीदार यांनी केला आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com