भाजपचा हिसका; काँग्रेसच्या यंग ब्रिगेडला पाडलं मोठं खिंडार

ज्योतिरादित्य शिंदे, जितीन प्रसाद यांच्यानंतर आता भाजपने आर. पी. एन. सिंग यांना गळाला लावले आहे.
Milind Devra, Sachin Pilot, Jitin Prasad, RPN Singh, Jyotiraditya Scindia
Milind Devra, Sachin Pilot, Jitin Prasad, RPN Singh, Jyotiraditya ScindiaSarkarnama

नवी दिल्ली : देशात भाजपची (BJP) सत्ता आल्यानंतर काँग्रेसमधील अनेक नेते पक्षांतर करत आहेत. त्यातही प्रामुख्याने काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या यंग ब्रिगेडला भाजपने खिंडार पाडलं आहे. नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) व मंत्री जितीन प्रसाद (Jitin Prasad) या बड्या नेत्यांनंतर मंगळवारी उत्तर प्रदेशातील आर. पी. एन. सिंग (R. P. N. Singh) यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. त्यामुळे युपीए सरकारमध्ये मंत्री म्हणून काम पाहिलेले ते भाजपमध्ये जाणारे तिसरे नेते ठरले आहेत.

सिंग यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश करत काँग्रेसला (Congress) धक्का दिला. विशेष म्हणजे त्यांच्या भाजप प्रवेशावेळी ज्योतिरादित्य शिंदे हे स्वत: उपस्थित होते. त्यामुळे शिंदे यांनीच सिंग यांना भाजपमध्ये नेल्याची चर्चाही आता सुरू झाली आहे. सिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे तोंडभरून कौतुक केले.

Milind Devra, Sachin Pilot, Jitin Prasad, RPN Singh, Jyotiraditya Scindia
मी एकटा पडतोय, महिला आयोगाचा पाठिंबा हवा! संजय पांडे यांनी मांडली व्यथा

सिंग यांना पडरौना विधानसभा मतदारसंघात तिकीट मिळण्याची शक्यता आहे. याच मतदारसंघाचे त्यांनी यापूर्वी तीनेवळा प्रतिनिधित्व केले आहे. तसेच कुशीनगर लोकसभा मतदारसंघातूनही ते निवडून आले होते. त्यानंतर त्यांना युपीए दोनमध्ये केंद्रीय राज्यमंत्री पद देण्यात आलं होतं. तसेच काँग्रेसने सोमवारी जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीतही सिंग यांचे नाव होते. सिंग यांच्या निकवर्तीयांना तिकीट नाकारल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती.

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला मागील काही महिन्यांतील हा दुसरा मोठा धक्का आहे. त्यांच्याआधी माजी केंद्रीय मंत्री व यंग ब्रिगेडमधील नेते जितीन प्रसाद यांनी मागील वर्षी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये मंत्रिपदही मिळालं. दोन वर्षांत काँग्रेसने अनेक बड्या नेत्यांना मगावलं आहे. त्यापैकी सर्वात मोठं नाव म्हणजे ज्योतिरादित्य शिंदे.

Milind Devra, Sachin Pilot, Jitin Prasad, RPN Singh, Jyotiraditya Scindia
पूनम महाजनांसमोर राऊतांची माघार; नामर्द म्हणताच 'ते' ट्विट केलं डिलीट

शिंदे यांनी 2020 मध्ये काँग्रेस सोडली. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे मध्य प्रदेशातील काँग्रेसचं सरकार कोसळलं. शिंदे हे राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळचे नेते होते. त्यामुळे त्यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. आता त्यांच्या यंग ब्रिगेडमध्ये सचिन पायलट हे एक मोठं नाव नाराज असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून आहे. राजस्थानमधील कॅबिनेटच्या विस्तारावरून ते नाराज होते. पण त्यांची नाराजी दूर झाल्याचे पायलट यांनी काही त्यानंतर सांगितले होते. पण अधूनमधून मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि पायलट यांच्यातील बेबनावाच्या बातम्या येत असतात.

भाजपने काँग्रेसची यंग ब्रिगेड खिळखिळी केली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात काँग्रेसची ताकद कमी झाली आहे. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत हा धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशात सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यावर निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्यासाठीही हा मोठा झटका असल्याचे मानला जात आहे. उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर तीन उमेदवारांनी आधीच पक्षाला रामराम ठोकला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com