कॉंग्रेसचा बडा नेता भाजपच्या गळाला; भाजपचा गौप्यस्फोट

Goa Politics| Congress| BJP| काँग्रेसने पत्रकार परिषदेनंतर गोव्यात सत्तास्थापनेसाठी भाजपच्या हालचालींना वेग
BJP Goa
BJP Goa

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने दुसऱ्यांदा बाजी मारत 20 जागा जिंकल्या. मात्र सर्वाधिक जागा जिंकूमही भाजपने (BJP) अद्याप गोव्यात सत्तास्थापनेचा दावा केला नाही. हे पाहता काँग्रेस (Congress) नेते दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. (Goa Political news update)

यावेळी त्यांनी भाजपकडून सत्तास्थापनेसाठी होणाऱ्या विलंबावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राज्यपालांनी लक्ष घालावे, किंवा तर गोव्यात भाजप सरकार बनवण्यात अपयशी ठरत असेल तर दुसऱ्या क्रमांकाच्या पार्टीला संधी द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे नेता कार्लोस फरेरा यांनी केली. तर दुसरीकडे, भाजपला सत्ता स्थापन करता येत नसेल तर कॉंग्रेसला संधी द्या आम्ही सरकार स्थापन करु, असा दावाच काँग्रेस नेते मायकल लोबोंनी यांनी केला आहे.

BJP Goa
३० दिवसांत २५ हजार नोकऱ्या देणार : पंजाब कॅबिनेट पहिलाच निर्णय

त्यानंतर आता भाजपने कॉंग्रेसच्या या आक्षेपांचा खरपूस समाचार घेतला आहे. "काँग्रेसने सत्ता स्थापनेची स्वप्ने पाहू नयेत, त्यांनी अगोदर विरोधी पक्षनेता ठरवावा, इतकेच नव्हे तर सत्तेसाठी दिगंबर कामत (Digambar Kamat) भाजपमध्ये येण्याच्या प्रयत्न करत आहेत. दिगंबर कामत भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या संपर्कात असल्याचा दावा भाजप प्रवक्ते उरफान मुल्ला यांनी केला आहे. त्यामुळे गोव्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

दरम्यान काँग्रेसने पत्रकार परिषद घेतल्यानंतर भाजप नेत्यांनी सत्तास्थापनेसाठी कंबर कसल्याचे दिसत आहे. भाजपमध्ये सत्तास्थापनेच्या हालचाली वाढल्या आहेत. 25 मार्चपूर्वी गोव्यात नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरु केले आहेत. दरम्यान येत्या आठ दिवसात मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल, असा दावा गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com