काश्मीरमधील हिंसेच्या वेळी अमित शहा गरबा खेळत होते ; कॉग्रेसचा घणाघात

जम्मू काश्मीरमध्ये हिंसा होत असताना अमित शह (Amit Shah) हे नवरात्राचा गरबा खेळत होते. त्यांना हा प्रश्न का विचारला जात नाही,'' असा सवालही रजनी पाटील (Congress leader Rajni Patil) यांनी केला. त्या माध्यमांशी बोलत होत्या.

 
काश्मीरमधील हिंसेच्या वेळी अमित शहा गरबा खेळत होते ; कॉग्रेसचा घणाघात
Rajni Patil, Amit Shahsarkarnama

नवी दिल्ली : लखीमपूर खिरीला (Lakhimpur Khiri Violence) जाणारे कॉग्रेसचे नेके राहुल गांधी, प्रियांका गांधी काश्मीरला का गेले नाहीत, या भाजपच्या आक्षेपाला काँग्रेसच्या जम्मू-काश्मीरच्या प्रभारी रजनी पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ''हिंसाग्रस्त कुटुंबीयांना आपले भेटणे हे राहुल यांच्या आदेशानुसारच होते. पक्षाच्या कार्यक्रमासाठी भुवनेश्वरमध्ये असताना राहुल यांनी आपल्याला फोन करून काश्मीरला जाण्यास सांगितले होते. जम्मू काश्मीरच्या प्रभारी म्हणून काँग्रेसच्या प्रतिनिधी या नात्याने मी पीडित कुटुंबांचे सांत्वन केले. जम्मू काश्मीरमध्ये हिंसा होत असताना अमित शह (Amit Shah) हे नवरात्राचा गरबा खेळत होते. त्यांना हा प्रश्न का विचारला जात नाही,'' असा सवालही रजनी पाटील (Congress leader Rajni Patil) यांनी केला. त्या माध्यमांशी बोलत होत्या.

Rajni Patil, Amit Shah
कबड्डीपटू मुलीच्या खूनप्रकरणी अजित पवारांचा पोलिसांना आदेश

''काश्मीर खोरे पुन्हा अशांत होऊ लागले असून दहशतवाद्यांनी निष्पाप नागरिकांचे केलेले हत्याकांड मन विषण्ण करणारे आहे. ३७० कलम हटविल्यानंतर सारे काही सुरळीत असल्याचा दावा करणारे केंद्र सरकार आणि स्थानिक प्रशासनच या हिंसेला जबाबदार आहे, असा आरोप रजनी पाटील यांनी केला. रजनी पाटील यांनी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात बळी पडलेल्या मख्खनलाल बिंद्रू आणि शिक्षिका सुपेंद्र कौर यांच्या कुटुंबीयांची श्रीनगरमध्ये, तर दिवंगत शिक्षक दीपकचंद यांच्या कुटुंबीयांची जम्मू येथे नुकतीच भेट घेतली. त्यानंतर मंगळवारी दिल्लीत येऊन त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. तत्पूर्वी, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Rajni Patil, Amit Shah
राष्ट्रवादीने गंभीर आरोप केलेले NCBचे समीर वानखेडेंना पुन्हा मुदतवाढ

''आतापर्यंत शिक्षकांवर कधीही हल्ले झाले नव्हते. ही विशिष्ट उद्दिष्टाने केलेली हत्या आहे. यामागची नेमकी कारणे शोधावी लागतील. मात्र, ३७० कलम हटविल्यानंतर सारे काही सुरळीत झाल्याचे दावे केंद्राकडून केले जात होते, असे असताना काश्मीरमध्ये असे भयाचे वातावरण निर्माण होणे, लोकांच्या मनात भयामुळे स्थलांतराची भावना निर्माण होणे हे हे केंद्र सरकारचे, गृह मंत्रालयाचे अपयश आहे. केंद्राने ही जबाबदारी स्वीकारायला हवी. लोकांना त्यांनी सुरक्षितता द्यावी, '' असे रजनी पाटील यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.