राहुल गांधींचा पबमधील व्हिडीओ तुफान व्हायरल; मैत्रिणीच्या विवाहासाठी नेपाळमध्ये

काँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या नेपाळच्या दौऱ्यावर असून भाजपच्या नेत्यांनी हा व्हिडीओ व्हायरल केला आहे.
Rahul Gandhi Latest News, Rahul Gandhi Pub Video Viral
Rahul Gandhi Latest News, Rahul Gandhi Pub Video ViralSarkarnama

नवी दिल्ली : काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या नेपाळच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या एका मैत्रिणीच्या विवाहासाठी ते तिथं गेले आहेत. यादरम्यानचा त्यांना एक व्हिडीओ सोशल मीडियात (Social Media) तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये ते काठमांडू येथील एका नाईटक्लबमध्ये दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल करत भाजपने (BJP) काँग्रेस व राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. (Rahul Gandhi Pub Video Viral)

राहुल गांधी यांचा हा व्हिडीओ नेपाळमधील लॉर्ड ऑफ दि ड्रिंक्स या पबमधील असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडीओमध्ये ते संगीत पार्टीचा आनंद घेताना दिसत आहे. तसेच महिलेशी बोलताना, मोबाईल पाहतानाही या व्हिडीओमध्ये ते दिसत आहेत. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत टीकास्त्र सोडलं आहे.

Rahul Gandhi Latest News, Rahul Gandhi Pub Video Viral
संभाजीराजेंनी दिले 'राजकीय' संकेत; मुंबई किंवा पुण्यात करणार घोषणा

रिजिजू यांनी म्हटलं आहे की, 'सुट्टी, पार्टी, प्लेजर ट्रीप, खासगी परदेश भेट आदी आता देशासाठी आता नवे नाही.' भाजपच्या सोशल मीडिया विभागाचे प्रमुख अमित मालविया यांनीही टीका केली आहे. 'जेव्हा मुंबईवर हल्ला झाला तेव्हाही राहुल गांधी नाईटक्लबमध्ये होते. आता पक्ष संकटात आहे, तरीही ते नाईकक्लबमध्येच आहेत. त्यांच्यामध्ये सातत्य आहे,' असा टोला मालविया यांनी लगावला आहे.

भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले, राहुल गांधी काय करत आहेत, हा त्यांचा खासगी प्रश्न आहे. पण जेव्हा राजस्थानमधील जोधपूरमध्ये हिंसा होत आहे, तिथे काँग्रेसचं सरकार आहे, राजस्थान पेटलं आहे. यावर चिंता व्यक्त करण्याऐवजी राहुल गांधी नेपाळमधील नाईटक्लबमध्ये पार्टी करत आहेत. त्यांनी आता भारतातील लोकांसोबत राहून त्यांच्या समस्या समजून घ्यायला हव्यात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com