हार्दिक पटेलांची नाराजी दूर करण्यासाठी राहुल गांधींची अशीही खेळी

हार्दिक पटेलांच्या नाराजीमुळं काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर
हार्दिक पटेलांची नाराजी दूर करण्यासाठी राहुल गांधींची अशीही खेळी
Rahul Gandhi and Hardik Patel, Hardik Patel Latest News in MarathiSarkarnama

गांधीनगर : गुजरात (Gujarat) काँग्रेसमधील (Congress) अंतर्गत नाराजी समोर आली आहे. प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी पक्षावर टीकेची झोड उठवल्यानंतर राजकारण तापलं आहे. पटेल हे पक्ष सोडणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहेत. त्यातच त्यांनी भाजपचं (BJP) तोंडभरून कौतुक केल्यानं सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. आता पटेलांची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीच पाऊल उचललं आहे. (Hardik Patel Latest News in Marathi)

गुजरातमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राहुल गांधी राज्यात दाखल झाले आहेत. हार्दिक पटेल हे पाटीदार समाजाचे ताकदवान नेते आहेत. ते नाराज असल्याने पक्षातील मतभेद उघड झाले आहेत. त्यांनी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वावर टीका केली नसली तरी राज्यातील नेतृत्वावर हल्लाबोल केला आहे. आता खुद्द राहुल गांधी हेच पटेल यांची भेट घेणार आहेत. ते पटेल यांचे म्हणणे ऐकून त्यांची नाराजी दूर करतील. याआधी राहुल गांधींनी पटेल यांना संदेश देऊन पक्षातच थांबण्याची सूचना केली होती. काँग्रेसचे प्रभारी आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याची खेळी राहुल यांनी खेळली आहे. या बैठकीत ते पटेल यांना बोलावून त्यांची नाराजी समोरासमोर दूर करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Rahul Gandhi and Hardik Patel, Hardik Patel Latest News in Marathi
भाजप नेत्यावरून तीन राज्यांतील पोलिसांत जुंपली अन् अखेर उच्च न्यायालयाचा दिलासा

हार्दिक पटेल यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांवर हल्लाबोल केला होता. मात्र, त्यांनी भाजप प्रवेशाची चर्चा फेटाळून लावली होती. परंतु, त्यांनी तोंडभरून भाजपचे कौतुक केले होते. यामुळे पटेल हे भाजपशी जवळीक साधू शकतात, अशी चर्चा मोठ्या प्रमाणात झाली आहे. ते म्हणाले होते की, भाजपने मागील काही काळात घेतलेल्या निर्णय राजकीय हेतून घेतले आहेत. असे असले तरी त्यांच्यात निर्णय घेण्याची ताकद आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. भाजपची बाजू न घेता अथवा त्यांची स्तुती न करताही या सत्य गोष्टी आपण स्वीकारायला हव्यात. गुजरातमध्ये काँग्रेसला भक्कम व्हायचे असेल तर आपण निर्णय क्षमता वाढवायला हवी.

Rahul Gandhi and Hardik Patel, Hardik Patel Latest News in Marathi
राजकारण तापलं! सासूबाईंशी न पटल्यानं जावयानं थेट पक्षालाच केला रामराम

पटेल यांनी नुकताच पक्षावर आपल्याला दुर्लक्षित केले जात असल्याचा आरोप केला होता. नव्या नवऱ्याची नसबंदी केल्यासारखी माझी पक्षात अवस्था झाली आहे, असे वक्तव्य त्यांनी केलं होतं. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कार्यकारी अध्यक्षांनीच केलेल्या या आरोपांमुळे काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेस सोडण्याच्या चर्चेवर पटेल यांनी काँग्रेसमध्ये राहणार असल्याचे स्पष्ट केलं होतं. ते म्हणाले होते की, मी आतापर्यंत पक्षासाठी 100 टक्के योगदान दिलं आहे. यापुढेही पक्षात काम करत राहीन, असं सांगत पटेल यांनी काँग्रेस सोडण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.