काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोना संसर्ग

काँग्रेस नेते राहुल गांधी हे कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत आहेत.
congress leader rahul gandhi tests covid 19 positive
congress leader rahul gandhi tests covid 19 positive

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी हे कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यांना सौम्य लक्षणे असून, त्यांनीच ट्विटरवरुन याची माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. 

राहुल गांधी यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, मला काही सौम्य लक्षणे जाणवत होती. त्यानंतर मी चाचणी केल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाविषयक उपाययोजनांचे पालन करावे आणि सुरक्षित राहावे. 

राहुल गांधी यांनी देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील सभा रद्द केल्या होत्या. इतर राजकीय पक्षांनी जास्त गर्दी होईल, असा प्रचार करणे टाळावे, असे आवाहनही केले होते. ते म्हणाले होते की, देशातील सध्याचे कोरोना संकट पाहता पश्चिम बंगालमधील सर्व सभा मी रद्द करीत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी याबाबत विचार करण्याची आवश्यकता आहे. सध्याच्या परिस्थितीत जास्त गर्दी होईल अशा सभा घेणे धोक्याचे आहे. 

डॉ. मनमोहनसिंग 'एम्स'मध्ये दाखल 
दरम्यान, कालच (ता.19) माजी पंतप्रधान व काँग्रेस नेते डॉ. मनमोहनसिंग यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. . त्यांना ताप आल्याने दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) 88 वर्षांच्या मनमोहनसिंग यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांनी कोरोना लशीचे दोन्ही डोस आधीच घेतले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस 
केंद्र सरकारने कोरोना लसीकरणासाठी वयोमर्यादेची अट काढून टाकली आहे.काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी केंद्र सरकारकडे ही मागणी केली होती. केंद्र सरकारने सर्वांना लस देण्याची घोषणा केली आहे. कोरोना विरोधात लढण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. यामुळे 18 वर्षांवरील सर्व व्यक्ती लस मिळण्यास पात्र ठरणार आहेत. त्यांना 1 मेपासून लस देण्यास सुरवात होणार आहे. 

सध्या देशात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत देण्यात येत आहे. मात्र, खासगी रुग्णालयात यासाठी 250 रुपये मोजावे लागत होते. सरकारने आता ही किंमत कमी करुन 200 रुपयांवर आणली आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com