मोदीजी कर्तव्य पार पाडा; राहुल गांधीचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप...

Rahul Gandhi|Narendra Modi|BJP|Covid-19 : कॅाग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
मोदीजी कर्तव्य पार पाडा; राहुल गांधीचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप...
Rahul Gandhi News, PM Narendra Modi, Rahul Gandhi News Updates, Rahul Gandhi on PM Narendra ModiSarkarnama

नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कोरोना स्थिती हाताळण्यावरून केंद्र सरकार (Central-Government) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सरकारच्या गलथान कारभारामुळे कोरोना काळात 5 लाख नाही तर 40 लाख देशवासीयांनी आपले प्राण गमावले लागल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी ट्वीटरच्या माध्यमातून ही टीका केली असून मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची भरपाई देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. (Rahul Gandhi News Updates)

Rahul Gandhi News, PM Narendra Modi, Rahul Gandhi News Updates, Rahul Gandhi on PM Narendra Modi
मोदीजी कट्टरवाद्यांना आवरा...देशातील महत्वाच्या नेत्यांनी केले आवाहन..

राहुल गांधी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले की, 'मोदीजी ना स्वत: सत्य बोलतात ना बोलू देतात. ऑक्सिजनच्या कमरतेमुळे कोणालाही जीव गमवावा लागला नाही हा खोटा दावा ते अजूनही करतात. मी हे आधीच सांगितलं आहे. सरकारच्या कारभारामुळे ५ लाख नाही तर ४० लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. मोदीजी आपलं कर्तव्य पार पाडा आणि मृतांच्या नातेवाईकांना ४ लाख रुपयांची मदत द्या,' अशा शब्दात राहुल गांधी यांनी मोदी यांच्यावर टीका केली आहे.

दरम्यान, कोरोना मध्ये मृत्यू झालेल्या लोकांचा नेमका आकडा सार्वजनिक करण्याच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) प्रयत्नात भारत हा अडसर ठरत असल्याचा दावा 'न्यूयॉर्क टाइम्स'मधील एका अहवालामधून करण्यात आला आहे. नेमका हाच रिपोर्ट ट्विटरवर शेअर करत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आणि मोदींवर निशाणा साधला. मृत्यूसंख्या मोजण्यासाठी वापरण्यात येत असलेली पद्धत योग्य नसल्याचे सांगत नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेने नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर गांधी यांनी ही टीका केली आहे. राहुल गांधी यांच्या टीकेवर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.