राहुल गांधींनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार! पण...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी दररोज टीकास्त्र सोडतात.
राहुल गांधींनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार! पण...
PM Narendra Modi & Rahul Gandhi.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी दररोज टीकास्त्र सोडतात. पण शुक्रवारी त्यांनी मोदींचे आभार मानले आहेत. पण हे आभार म्हणजे त्यांनी पंतप्रधान मोदींना खोचक टोला लगावला आहे. इंधनाचे वाढते दर व वाढत्या महागाईवरून राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांनी शुक्रवारी सकाळी एक ट्विट करत वाढत्या महागाईचा मुद्या उपस्थित केला आहे. मागील काही महिन्यांपासून देशात इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. शुक्रवारीही पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाली. मागील 11 दिवसांत पेट्रोलचे दर 2 रुपये 35 पैशांनी तर डिझेलच्या दरात तीन रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या सण-उत्सवांचे दिवस आहेत. या दिवसांमध्येही इंधनाचे दर वाढत चालल्याने राहुल गांधींनी पंतप्रधानांना खोचक टोला लगावला आहे.

PM Narendra Modi & Rahul Gandhi.
नवाब मलिकांच्या आरोपानंतर मनीष भानुशालीने केला धक्कादायक दावा

राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'पेट्रोल, डिझेल, एलपीजी, खाद्यान्नाच्या किंमती वाढत चालल्या आहेत. सणांचा उत्साह कमी करून टाकला. मोदीजी तुमचे आभार.' अशा शब्दांमध्ये राहुल यांनी टीका केली आहे. दरम्यान, शुक्रवारीही पेट्रोलच्या दरात दिल्लीत प्रतिलिटर 30 पैशांनी तर डिझेलच्या दरात 35 पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर 103.54 पैशांवर व डिझेलचे दर 92.12 रुपयांवर पोहचले आहेत. मुंबईमध्ये हे दर अनुक्रमे 109.54 रुपये आणि डिझेललचे दर 99.92 रुपयांवर गेले. मुंबईत पेट्रोलचे दर 29 पैशांनी तर डिझेलचे दर 37 पैशांनी वाढले.

गुरूवारचे पेट्रोल व डिझेलचे दर

देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. आज सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. यामुळे देशात इंधन दर ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पोचले आहेत. देशातील सर्वांत स्वस्त पेट्रोल दीव दमणमध्ये तर महाग राजस्थानमधील गंगाननगमध्ये आहे.

PM Narendra Modi & Rahul Gandhi.
पंतप्रधान मोदींना मिळालेल्या वस्तूंच्या लिलावात एका भाल्याने केली कमाल!

देशात सर्वांत महाग पेट्रोल राजस्थानमधील गंगानगरमध्ये आहे. गंगानगरमध्ये आज पेट्रोलचा दर प्रतिलिटर 115.14 तर डिझेलचा दर प्रतिलिटर 105.64 रुपये आहे. केंद्रशासित प्रदेश असलेल्या दीव दमण पेट्रोल सर्वांत स्वस्त आहे. तेथे पेट्रोलचा दर प्रतिलिटर 98.26 रुपये आहे. देशातील राज्यांच्या राजधान्यांपैकी केवळ डेहराडून, चंडीगड, गुवाहाटी आणि रांची या चार ठिकाणी पेट्रोलचा दर शंभरच्या आत आहे.

देशभरात आज पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 30 पैसे तर डिझेलच्या दरात 35 पैसे वाढ करण्यात आली. दिल्लीत आज पेट्रोलचा दर 103.24 रुपये तर मुंबईत 109 रुपयांवर गेला आहे. डिझेलचा दर दिल्लीत 91.77 रुपये आणि मुंबईत 99.55 रुपयांवर पोचला आहे. देशातील चार राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या निकाल लागल्यानंतर 2 मेपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. यामुळे सामान्य नागरिकांना इंधन दरवाढीचे चटके बसत आहेत.

Related Stories

No stories found.