दलाल, गो बॅक! पक्षाच्या नेत्याविरोधातच चिदंबरम न्यायालयात; महिलेसह वकिलांनी दाखवला हिसका

काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांच्यावर बुधवारी कोलकता उच्च न्यायालयात नामुष्की ओढवली.
दलाल, गो बॅक! पक्षाच्या नेत्याविरोधातच चिदंबरम न्यायालयात; महिलेसह वकिलांनी दाखवला हिसका
P. Chidambaram in Kolkata High CourtSarkarnama

कोलकता : काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांच्यावर बुधवारी कोलकता उच्च न्यायालयात (High Court) नामुष्की ओढवली. पक्षाचे नेते खासदार अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांनी एका प्रकरणात राज्य सरकारविरोधात केलेल्या याचिकेवर सुनावली झाली. यावेळी चिदंबरम यांनी सरकारची बाजू मांडली. पण त्यानंतर काँग्रेसच्या (Congress) विचारांच्या वकिलांनी चिदंबरम यांच्यावर हल्लाबोल केला. चिदंबरम यांना दलाल म्हणत त्यांनी गो बॅकच्या घोषणा दिल्या.

कोलकता उच्च न्यायालयात बुधवारी मेट्रो डेअरी प्रकरणात (Metro Dairy Case) सुनावणीसाठी चिदंबरम आले होते. या प्रकरणात त्यांनी तृणमूल सरकारच्यावतीने बाजू मांडली. याप्रकरणी चौधरी यांनी याचिका दाखल केली आहे. ते पश्चिम बंगाल (West Bengal) काँग्रेसचे अध्यक्षही आहेत. बुधवारी चिदंबरम हे याचिकाकर्त्यांची उलटतपासणी घेण्यासाठी आले होते. चौधरी यांनी सरकारच्या मेट्रो डेअरी या कंपनीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.

P. Chidambaram in Kolkata High Court
संदीप देशपांडे पोलिसांच्या हातून निसटले; धावपळीत महिला कर्मचारी जखमी

चिदंबरम न्यायालयात आल्यानंतर काँग्रेसच्या विचारांच्या वकिलांनी चिदंबरम यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. चौधरी यांचे वकील कौस्तुभ बागची यांचाही त्यामध्ये समावेश होता. एक महिला वकिलांनी कोट काढत त्यांच्या दिशेने भिरकावत होती. सुमित्रा नियोगी असं त्यांचं नाव होतं. या वकिलांकडून चिदंबरम यांच्यावर दलालीचा आरोप करण्यात आला.

चिदंबरम यांच्यासारख्या नेत्यांमुळेच पक्षाची वाताहात झाली आहे. चिदंबरम गो बॅक, अशा घोषणाही या वकिलांनी दिल्या. तुमच्यासारख्या लोकांमुळे राज्यात पक्षाची कामगिरी चांगली झाली नाही. त्यामुळे काही काळ न्यायालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अन्य वकिल व सुरक्षारक्षकांनी चिदंबरम यांना त्यांच्यापासून दूर नेत गाडीत बसवले. पण त्यानंतरही वकील त्यांच्या गाडीसमोर येत घोषणाबाजी करत होते.

दरम्यान, हे दोन्ही वकील काँग्रेसच्या लिगल सेलचे सदस्य असल्याचे सांगितले जात आहे. अधीर रंजन चौधरी यांनी दाखल केलेल्या याचिकेविरोधात चिदंबरम राज्य सरकारच्या बाजूने उभे राहिल्याने त्यांना या रोषाला सामोरे जावे लागल्याचे सांगितले जात आहे. एकीकडे चौधरी हे सातत्याने राज्य सरकारवर टीका करत असताना चिदंबरमचं त्यांच्याबाजूने न्यायालयात हजर झाल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.