अखेर सिद्धूला कारागृहात काम मिळालं पण सुरक्षेच्या कारणास्तव 'वर्क फ्रॉम कोठडी'

नवज्योतसिंग सिद्धू कैदी क्रमांक २४१३८३
Navjot Singh Sidhu
Navjot Singh Sidhu Sarkarnama

चंडीगड : काँग्रेस (Congress) नेते नवज्योतसिंग सिद्धू यांना 34 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सिद्धू हे पतियाळा कारागृहात आहेत. सिद्धूंचा कैदी क्रमांक २४१३८३ आहेत. त्यांना आता तुरुंगात लिपिकाचे काम देण्यात आले असून, सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना कोठडीत राहूनच हे काम करावं लागेल. (Congres Leader Navjot Singh Sidhu News)

पातियाळा कारागृहात बराक क्रमांक सातमध्ये सिद्धूंना ठेवण्यात आलं आहे. त्यांना आता लिपिकाचे काम देण्यात आले आहे. पण हे काम करण्यासाठी त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्या कोठडीच्या बाहेर पडता येणार नाही.कारागृहातील फायली त्यांच्या कोठडीत पाठवण्यात येतील. सिद्धूंना आता न्यायालयाचे लांबलचक निकाल संक्षिप्त स्वरुपात करण्याचे प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच, कारागृहातील गोष्टींच्या नोंदी फायलीत ठेवण्याचेही प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सिद्धूंना कारागृहात आता सरकार नेमून देईल ते काम करावे लागेल. यासाठी त्यांना रोजचा ३० ते ९० रुपये पगार मिळेल. अकुशल, अर्धकुशल आणि कुशल अशा वर्गवारीवरून हा पगार ठरतो. पण सिद्धूंना सुरवातीला तीन महिने प्रशिक्षण देण्यात येईल आणि या कालावधीत त्यांना पगार मिळणार नाही. शिक्षा झालेल्या गुन्हेगारांनी दिवसाला आठ तास काम करावे लागते.

सिद्धूंचा असा असेल कारागृहातील दिनक्रम

सकाळी ५.३० : झोपेतून उठणे

सकाळी ७ : चहा बिस्कीट अथवा नाश्ता

सकाळी ८.३० : जेवण (सहा चपाती, डाळ अथवा भाजी) नंतर कामावर हजेरी

सायंकाळी ५.३० : नेमून दिलेलं काम संपवणं

सायंकाळी ६ : रात्रीचं जेवण (सहा चपाती, डाळ अथवा भाजी)

रात्री ७ : पुन्हा बराकीत बंद

Navjot Singh Sidhu
श्रीलंकेचा पाय खोलात जाताच खुद्द पंतप्रधानांनीच हाती घेतलं अर्थ खाते

या प्रकरणाची सुनावणी तीन दशकांहून अधिक काळ सुरू होती. त्यामध्ये न्यायालयाने सिध्दूंना एक वर्षाची शिक्षा ठोठावली. ते काल (ता.२०) न्यायालयासमोर शरण येणार, अशी चर्चा होती. पण त्यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. आरोग्याच्या कारणांमुळे शरण येण्यासाठी काही आठवड्यांचा वेळ मिळावा, अशी विनंती करण्यात आली होती. पीडितांच्या वकिलांनी मात्र त्यास विरोध केला होता. सर्वोच्च न्यायालयानं सिद्धूंच्या वकिलांना दुसऱ्या खंडपीठासमोर अर्ज करण्यास सांगितलं होतं. आता या अर्जावर सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. यामुळं तातडीनं दिलासा न मिळाल्यानं सिद्धू हे अखेर पतियाळा न्यायालयासमोर शरण आले.

Navjot Singh Sidhu
भाजपनं तिसऱ्यांदा मुलाला तिकीट नाकारताच येडियुरप्पा म्हणाले...

सिद्धू आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पातियाळातील रहिवासी गुरनामसिंग यांच्याशी 1988 मध्ये भांडण झालं होत. पार्किंगच्या जागेवरून हा वाद झाला होता. सिद्धू आणि त्यांचे सहकारी रुपिंदरसिंग संधू यांनी गुरनाम यांना कारमधून बाहेर ओढून मारहाण केली होती. यात गुरनामचा मृत्यू झाला होता. दरम्यान, शिक्षा सुनावल्यानंतर सिध्दू यांनी ट्विट करीत प्रतिक्रिया दिली होती. न्यायालयाचा निर्णय मान्य असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com