काँग्रेसला मोठा धक्का; माजी खासदार किर्ती आझाद ठोकणार पक्षाला रामराम

मागील काही महिन्यांत काँग्रेसला अनेक धक्के बसले आहेत.
Kirti Azad
Kirti AzadSarkarnama

नवी दिल्ली : मागील काही महिन्यांत काँग्रेसमधील (Congress) अनेक नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. मंगळवारी माजी खासदार किर्ती आझाद (Kirti Azad) दिल्लीत तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) प्रवेश करणार आहेत. ते 2018 मध्ये भाजपमधून काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. पण पक्षात त्यांना फारसे महत्व राहिले नसल्याची चर्चा होती. त्यामुळे त्यांनी पक्षांतर करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

भाजपने (BJP) आझाद यांना 23 डिसेंबर 2015 रोजी पक्षातून निलंबित केले होते. त्यांनी तत्कालीन अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यावर उघडपणे भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली होती. आझाद यांनी 2018 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करत राजकारणातील दुसरी इनिंग सुरू केली होती.

Kirti Azad
पाटणकर ठरले 'जायंट किलर'; गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा पराभव

1983 च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय टीमचे ते सदस्य होते. क्रिकेटमधून राजकारणात येत त्यांनी तीनवेळा लोकसभा निवडणूक जिंकली आहे. 2014 मध्येही ते भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. बिहारमधील दरभंगा मतदारसंघात त्यांचा दबदबा होता. पण जेटली यांच्यावरील टीका त्यांना भोवली.

ममता बॅनर्जी मंगळवारी दिल्लीत असून सायंकाळी पाच वाजत्या त्यांच्या उपस्थितीतच आझाद तृणमूलमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते. मागील काही दिवसांपासून तृणमूलमध्ये दाखल होणाऱ्या नेत्यांची यादी वाढली आहे. तृणमूलने पश्चिम बंगालसह गोवा व त्रिपुरामध्ये काँग्रेसला धक्के दिले आहेत. ममतांकडूनही उघडपणे काँग्रेसवर शरसंधान साधले जात आहे. तर दुसरीकडे त्यांच्याकडून भाजपविरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहनही केले जात आहे.

दरम्यान, काँग्रेसमधून मागील काही महिन्यांत ज्योतिरादित्य सिंधिया, जितीन प्रसाद, माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग, सुश्मिता देव आदी नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. पुढील वर्षी देशातील काही राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी तृणमूलने कंबर कसली आहे. प्रामुख्याने गोवा व त्रिपुरावर पक्षाची नजर आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com