कपिल सिब्बल म्हणाले, आयाराम, गयाराम गेले अन् आता आले प्रसादराम!

उत्तर प्रदेशमधील काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
कपिल सिब्बल म्हणाले, आयाराम, गयाराम गेले अन् आता आले प्रसादराम!
congress leader kapil sibal slams jitin prasda for switching party

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील काँग्रेस (Congress)  नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद (Jitin Prasada) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. काँग्रेसमधील फेरबदलाबाबत पक्ष नेतृत्वाला पत्र लिहिणाऱ्या 23 नाराज नेत्यांमध्ये (G 23) प्रसाद यांचा समावेश होता. याच 23 जणांचा गट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या नेत्यांमधील कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी या प्रकरणी देशातील राजकारणावर भाष्य केले आहे. 

माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल म्हणाले की, मी पक्षाचे नेतृत्वाने काय केले आणि काय केले नाही यावर बोलत बसणार नाही, आपण भारतीय राजकारणाच्या अशा एका टप्प्यावर पोचलो आहोत जिथे निर्णय हे केवळ विचारधारेच्या आधारावर होत नाहीत. या राजकारणाला मी प्रसाद राम राजकारण आहे. आधी आयाराम आणि गयाराम होते. हे आपण पश्चिल बंगालमध्ये पाहिले. भाजप जिंकणार असे वाटल्याने मोठ्या प्रमाणात इतर पक्षांतील नेते भाजपमध्ये दाखल झाले. 

आताच्या निवडणुका या तुमच्या विचारधारेच्या आधारावर लढल्या जात नाहीत. तुम्हाला त्या पक्षात जाऊन व्यक्तिगत स्वरुपाचा काय फायदा होईल या आधारावर निर्णय घेतले जातात. हे आधी मध्य प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रात घडले होते, असेही सिब्बल यांनी स्पष्ट केले. 

राहुल गांधी यांची यंग ब्रिगेड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्यांपैकी एक-एक मोहरा गळू लागला आहे. याची सुरूवात मध्य प्रदेशातून झाली. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार कोसळले होते. त्यानंतर पुन्हा भाजपचे सरकार येऊन शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री झाले होते. याचबरोबर शिंदे यांनी राज्यसभा सदस्यत्व मिळाले होते. 

पायलट यांचेही केले होते समर्थन 
राजस्थानातील काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांची पक्षाने उपमुख्यमंत्रिपद आणि प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी केली होती. पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात थेट बंडाचे निशाण उभारले होते. पायलट यांचे बंड अखेर चहाच्या पेल्यातील वादळ ठरले होते. त्यावेळीही जितिन प्रसाद यांनी पायलट यांची उघड बाजू घेतली होती. पक्षाच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतल्याने त्यावेळी आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. 

Edited by Sanjay jadhav

Related Stories

No stories found.