काँग्रेसला मोठा धक्का! थेट मोदींच्या उपस्थितीत माजी मंत्री करणार भाजपमध्ये प्रवेश

तीन वेळा आमदार अन् मंत्री राहिलेली नेता करणार काँग्रेसला रामराम
BJP and Congress
BJP and Congress Sarkarnama

गुवाहाटी : काँग्रेसची (Congress) गळती सुरूच असून, आता पक्षाला आणखी धक्का बसण्याची चिन्हे आहेत. माजी मंत्री व तीन वेळा आमदार राहिलेल्या महिला नेत्या बिस्मिता गोगोई (Bismit Gogoi) या काँग्रेसला रामराम करण्याच्या तयारीत आहेत. त्या भाजपच्या (BJP) वाटेवर आहेत. त्यांनी नुकतीच मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची गुप्तपणे भेट घेतली आहे.

बिस्मिता गोगोई यांच्या पक्षप्रवेश थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या उपस्थितीत होणार आहे. मोदी हे दिब्रुगड येथे भेट देणार असून, सात नवीन कर्करोग रुग्णालयांचे उद्घाटन करणार आहेत. गोगोईंच्या पक्षप्रवेशासाठी हा मुहूर्त निवडण्यात आला आहे. गोगोई या खुमताई मतदारसंघातील माजी आमदार आहेत. त्यांनी नुकतीच मुख्यमंत्री सरमा यांची भेट घेऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.

BJP and Congress
नवनीत राणांना प्यायला पाणी नाही अन् वॉशरुमलाही जाऊ दिलं नाही? सावंतांनी सत्य आणलं समोर

बिस्मिता गोगोई या आधी काँग्रेसच्या सरकारच्या काळात मंत्री होत्या. त्यांनी सांस्कृतिक, हस्तोद्योग, वस्त्रोद्योग, मधुमक्षिकापालन आणि मागास वर्ग कल्याण या मंत्रालयाची धुरा सांभाळली होती. नंतर त्यांची अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली होती. बिस्मिता या आसामचे माजी विधानसभा अध्यक्ष दिवंगत काँग्रेस नेते जिबा कांता गोगोई यांच्या स्नुषा आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे.

BJP and Congress
मै झुकेगा नही! पोलिसांनी अटक करताच जिग्नेश मेवानींचा थेट 'पुष्पा'स्टाईल इशारा

नुकतीच काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व माजी खासदार रिपुन बोरा (Ripun Bora) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. राज्यातील पक्षांतर्गत वादावर बोट ठेवत त्यांनी पक्ष सोडला. त्यानंतर काही तासांतच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी त्यांना गळाला लावले. बोरा यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) प्रवेश केला आहे. बोरा हे राज्यसभेचे खासदार होते. त्यांची मुदत संपल्यानंतर त्यांना काँग्रेसकडून पुन्हा संधी देण्यात आली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. काँग्रेस आमदारांनी जाणीवपूर्वक मतदानात चूक केल्याने हा पराभव झाला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com