Adhir Ranjan Chowdhury: ''राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी पंतप्रधान आणि ममता बॅनर्जी यांच्यात डील''

Congress News: काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांचा ममता बॅनर्जी यांच्यावर आरोप
Narendra Modi, Mamata Banerjee
Narendra Modi, Mamata BanerjeeSarkarnama

Rahul Gandhi News: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लंडनमध्ये केलेल्या वक्तव्यावरून भाजप आक्रमक झाली आहे. संसदेमध्येही भाजपने राहुल गांधी यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातच आता काँग्रेसचे (Congress) खासदार अधीर रंजन चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यावर निशाणा साधला आहे.

Narendra Modi, Mamata Banerjee
Mamata Banerjee : राहुल गांधी हेच मोदींचे सर्वात मोठे 'टीआरपी' ; ममता म्हणाल्या, "राहुल गांधींना 'हिरो'बनविण्याचा प्रयत्न.."

अधीर रंजन चौधरी म्हणाले, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात ''राहुल गांधी आणि काँग्रेसची बदनाणी करण्यासाठी'' करार झाल्याचा आरोप त्यांनी केला. "ममता बॅनर्जी पंतप्रधानांच्या सूचनेनुसार बोलत आहेत. राहुल गांधी आणि काँग्रेसची बदनामी करण्यासाठी पंतप्रधान आणि 'दीदी' यांच्यात डील झाले आहे. त्यांना ईडी आणि सीबीआयच्या छाप्यांपासून वाचवायचे आहे. त्यामुळेच त्या काँग्रेसच्या विरोधात बोलत आहेत, असा आरोप चौधरी यांनी केला.

राहुल गांधी यांनी लंडनमध्ये केलेल्या वक्तव्यावरून संसदेचे कामकाज रोखून भाजप अनेक प्रश्नावरुन लक्ष हटवण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुकांपूर्वी मुर्शिदाबाद आणि मालदा जिल्ह्यांतील विविध भागांतील 2, 000 हून अधिक तृणमूल काँग्रेस (TMC) आणि भाजपचे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये आले, असल्याचा दावा चौधरी यांनी केला.

Narendra Modi, Mamata Banerjee
BJP News : 'सावरकर समझा क्या..; काँग्रेसच्या टि्वटला भाजपचे प्रत्युत्तर , वाजपेयींचा तो Video व्हायरल

पश्चिम बंगालमध्ये मे आणि जूनमध्ये पंचायत निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यावरुन पश्चिम बंगालमध्ये राजकारण तापले आहे. दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराने तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला होता. त्यामुळे काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्ये तणाव वाढला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com