Rajasthan News : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री गेहलोतांना 'चिरंजीवी'कडून अपेक्षा; काँग्रेस लागली कामाला

Rajasthan News : राजस्थानमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.
Ashok Gehlot
Ashok GehlotSarkarnama

Rajasthan News : राजस्थानमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र, त्यासाठी आता पासूनच मोर्चे बांधणी सुरु झाली आहे. काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या यात्रेलाही राजस्थानमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. असे असले तरी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आपल्या सरकारच्या विविध योजनांवर अधिक भर देण्यास सुरुवात केली आहे.

राजस्थानमध्ये (Rajasthan News) काँग्रेससमोर भाजपचे कडवे आव्हान असणार आहे. भाजपनेही विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे. अशात काँग्रेसला या राज्याकडून मोठ्या प्रमाणात आपेक्षा आहेत. गेहलोत सरकार येथे आपल्या योजनांची प्रभावी अमलबंजावणी करत आहे. मात्र, अंतर्गत कलह हे त्यांच्या समोरील मोठे आव्हान असणार आहे.

Ashok Gehlot
Congress : कॉंग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष येणार अडचणीत, शहराध्यक्ष आमदार ठाकरेंनी केली ‘ही’ सक्ती...

तसेच भाजपमध्येही माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि केंद्रीय नेतृत्वामध्ये सुप्त संघर्ष आहे. वसुंधरा राजे यांच्या ऐवजी दुसऱ्या नेत्याला भाजप येथे संधी देऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मात्र, वसुंधरा राजे यांना मानणारा वर्ग राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे भाजपचा राजस्थानमध्ये चेहरा नेमका कोण असणार यावरुन चर्चा सुरु आहे.

दरम्यान, काँग्रेसला राजस्थानमध्ये पुन्हा सत्तेत येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे गेहलोत सरकारची आरोग्य योजना असलेल्या 'चिरंजीवी' प्रचार मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. गेहलोत सरकारला चार वर्षे पूर्ण होत आहेत. या योजनेचा राज्यात आतापर्यंत २७ लाखांहून अधिक रुग्णांनी लाभ घेतला आहे.

Ashok Gehlot
विरोधकांच्या दणक्यानंतर शिंदे सरकार बॅकफूटवर! 'निर्भया' पथकातील वाहनं परतीच्या वाटेवर...

या योजने संदर्भात गेहलोत म्हणाले, 'ही योजना अतिशय चांगली आहे. प्रत्येक व्यक्तिचा 10 लाखांचा आरोग्य विमा आहे. यासोबतच अपघातात मृत्यू झाल्यास ५ लाख रुपयांची मदतही दिली जात आहे. 'चिरंजीवी' योजना देशाने स्वीकारली पाहिजे. अशा परिस्थितीत चिरंजीवी आरोग्य विमा योजना त्यांच्यासाठी निवडणुकीत रामबाण उपाय ठरू शकते, अशी अपेक्षा राजस्थान सरकारला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com