अमरिंदरसिंगांची विकेट? काँग्रेसनं तातडीनं बोलावली आमदारांची बैठक

पंजाबमध्ये मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील वाद टोकाला पोचला आहे.
congress immediately convene meeting of party mlas
congress immediately convene meeting of party mlas

नवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांच्यातील वाद टोकाला पोचला आहे. यामुळे आता मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांना हटवले जाण्याचे संकेत मिळत आहे. यासाठी काँग्रेस (Congress) हाय कमांडने तातडीने आज सायंकाळी आमदारांची बैठक बोलावली आहे. यात नवीन मुख्यमंत्र्यांची निवड केली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.  

पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत यांनी याबाबत ट्विट केले आहे. पक्षाच्या अनेक आमदारांनी तातडीने बैठक बोलावण्याची मागणी केली होती. यानुसार आज सायंकाळी ही बैठक होत आहे. पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीने ही सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला सर्व आमदारांनी उपस्थित राहावे, असे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसने अचानक बैठक बोलावल्याने राज्यात मुख्यमंत्री बदल होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.  

मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी पक्षाच्या आमदारांशी संपर्क साधण्यास सुरवात केली आहे. त्यांनी समर्थक आमदारांची मूठ बांधण्यास सुरवात केली आहे. याचवेळी पक्षाच्या अनेक आमदारांनी अमरिंदरसिंगांनी बदलण्याची मागणी लावून धरली आहे. त्यांचे वारंवार पक्ष नेतृत्वाशीही खटके उडू लागले आहेत. पुढील वर्षी राज्यात विधानसभा निवडणूक होत असल्याने पक्ष नेतृत्वाला लवकरात लवकर या वादावर तोडगा काढायचा आहे. आजच्या बैठकीत नवीन मुख्यमंत्री निवडला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाची बढती मिळताच त्यांनी पुन्हा आमदारांना हाताशी धरुन मुख्यमंत्र्यांविरोधात कुरघोड्या सुरू केल्या. परंतु, काँग्रेस हाय कमांडने अमरिंदर हेच राज्यात कॅप्टन असतील, हे स्पष्ट केले होते. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री आणि सिद्धू यांच्या वादावर पडदा पडला होता. पण पुन्हा एकदा सिद्धू यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात मोर्चा उघडला आहे. पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. या पार्श्वभूमीवर हा वाद निर्माण झाल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. आता यावर सोनिया गांधी आणि राहुल गांधी काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे. 

मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात मागील 2017 च्या विधानसभा निवडणुकीपासून वाद सुरू आहे. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या सिद्धू यांनी काँग्रेसच्या विजयानंतर पंजाबमध्ये उपमुख्यमंत्रिपद मिळेल, अशी शक्यता होती. परंतु, मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी याला विरोध केल्याने सिद्धू यांना दुसरे मंत्रालय देण्यात आले होते. तेव्हापासून दोघांचा वाद सुरू असून, सिद्धू यांनी उघड बंड पुकारले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com