चव्हाण, शिंदेंसह ११ काॅंग्रेस आमदार संकटात : निलंबन किंवा हकालपट्टी यावर नेतृत्व ठाम!

Congress | : ११ आमदारांची गैरहजेरी; तुम्ही काय करता? असा सवाल करत हायकमांडकडून राज्यातील नेत्यांची झाडाझडती घेण्यात आली होती.
Congress MLA
Congress MLASarkarnama

मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan), माजी मंत्री विजय वडेट्टीवार, आमदार प्रणिती शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेसचे (Congress) विधानसभेतील तब्बल ११ आमदार संकटात आले आहेत. सोमवारी बहुमत चाचणीदिवशी सभागृहात गैरहजर राहिल्याने काँग्रेस हायकमांड पक्षशिस्त मोडल्याच्या आरोपाखाली या ११ आमदारांवर कडक कारवाई करण्यावर ठाम असून केवळ निलंबन किंवा हकालपट्टी हीच कारवाई केली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

सोमवारी शिंदे सरकारच्या बहुमत चाचणीवेळी महाविकास आघाडी शंभरीही गाठू शकलेले नव्हती. या दिवशी काँग्रेसचे तब्बल ११ आमदार गैरहजर होते. याच दिवशी पक्षशिस्त मोडल्याची दखल हायकमांकडून घेण्यात आली आहे. दरम्यान अनुपस्थित या आमदारांनी हायकमांडला पाठवलेली कारण मान्य करण्यात आलेली नाहीत. (Congress MLAs, including the former chief minister, abstained from the majority test)

हे ११ आमदार संकटात :

या ११ आमदारांमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, सर्वश्री आमदार धीरज देशमुख, झिशान सिद्दीकी, जितेश अंतापूरकर, कुणाल पाटील, प्रणिती शिंदे, राजू आवळे, मोहन हंबर्डे, शिरीष चौधरी, माधवराव जवळगावकर यांचा समावेश आहे.

अशोक चव्हाण आणि विजय वडेट्टीवार यांनी उशिरा आल्याचे कारण दिले. त्यावेळी दरवाजा बंद करण्यात आलेले होते, त्यामुळे बाहेरच थांबावे लागले. तर आमदार प्रणिती शिंदे या परदेशात न्यूयॉर्कमध्ये आहेत. विधानसभा अध्यक्ष निवडणूक आणि बहुमत चाचणी या दोन्हीवेळी अनुपस्थित होत्या. आमदार अंतापूरकर यांचे लग्न होते. त्यामुळे ते गैरहजर होते. तर काल कुणाल पाटील अध्यक्षांच्या निवडणुकीवेळी हजर होते. पण, बहुमत चाचणीवेळी अनुपस्थित होते.

आज काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि संघटक सचिव के.सी वेणुगोपाल यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत या आमदारांवर कडक कारवाई करणार असल्याचे हायकमांडकडून सांगण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in