'येत्या एक-दीड वर्षांत राज्यात कॉंग्रेसचं सरकार येणार'- बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Congress| Michael Lobo| Goa Politics|गोव्याच्या राजकारणात काहीही होऊ शकतं
Goa congress
Goa congress

पणजी : उत्तरप्रदेश पाठोपाठ गोवा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत भाजपने पुन्हा एकदा सत्ता स्थापन केली. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी गेल्या आठवड्यात दुसऱ्यांदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. असे असतानाच गोव्यात(Goa) कॉंग्रेसचे (Congress) आमदार आणि विरोधी पक्षनेते मायकल लोबो (Michael Lobo) यांनी येत्या १० ते १५ महिन्यात गोव्यात कॉंग्रेसचं सरकार येईल, असा दावा केला आहे.

गोव्याच्या राजकारणात काहीही अशक्य नाही. गोव्याच्या राजकारणात अचानक कोणताही बदल होऊ शकतो. आम्ही येणाऱ्या काही महिन्यात राज्यात कॉंग्रेसचं सरकार स्थापन करु आणि त्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करु. येत्या एक-दीड वर्षात आम्ही गोव्यात कॉंग्रेसचं सरकार बनवण्यात सक्षम होऊ’, असा दावा मायकल लोबो यांनी केला आहे. दरम्यान एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, सध्या भाजपकडे 25 आमदारांचं संख्याबळ आहे. त्यामुळे त्यांचं सरकार पडण्याची शक्यता नाही. अशावेळी कॉंग्रेसचे सरकार स्थापन करण्यासाठी संख्याबळ कसं गोळा कराल? असा सवाल त्यांना विचारण्यात आल्यानंतर, त्यासाठी पुढील वर्ष महत्वपूर्ण असेल. आमचा पक्ष त्यासाठी प्रयत्न करेल पकडेल आणि सरकार बनवण्यात यशस्वी होईल, असा दावा लोबो यांनी केला.

Goa congress
साताऱ्यात राष्ट्रवादीची नवी खेळी; शिवसेनेला मात देण्यासाठी पार्थ पवारांना देणार उमेदवारी

आता कॉंग्रेसकडे 15 आमदारांचं संख्याबळ आहे. तर तीन जागा अपक्ष आणि दोन जागा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने जिंकल्या. त्यामुळे गोव्यात काहीही होऊ शकते. गोव्यातील 67.33 टक्के जनतेने भाजपला नाकारल्याचं निवडणुकीत सिद्ध झाले आहे. त्यामुळे आता फक्त गोव्यात काँग्रेसला पुनर्जीवित करण्यासाठी आपण जबाबदारी घेतली असल्याचा दावाही मायकलं लोबो यांनी केला आहे.

राज्यातील ६० टक्के जनतेने भाजपच्या विरोधात मतदान केलं. भाजपला फक्त 32 टक्के मते मिळाली. त्यामुळे मी नव्या जबाबदारीसह प्रतिनिधित्व करमार आहे. या 67 टक्के जनतेच्या पाठिंब्याने गोव्यात कॉंग्रेसचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास मायकलं लोबो यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणूकीत भाजपने 20 जागांवर विजय मिळवला. अपक्ष आमदार चंद्रकांत शेट्ये, एलेक्सियो रेजिनाल्डो लॉरेंसो आणि अंतोनिया वास यांनी आधीच भाजपला समर्थन दिलं होतं. तर एमजीपीचे आमदार रामकृष्ण ढवळीकर आणि जीत अरोलकर यांनीही नंतर भाजपला पाठिंबा दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com