priyanka gandhi
priyanka gandhisarkarnama

Congress:प्रियंकांचा राजीनामा का घेतला नाही ; जी-२३ नेत्यांचा पक्षश्रेष्ठींना सवाल

पराभवाला जबाबदार लोकांचीच पराभवाचा आढावा घेणाऱ्या समितीत वर्णी लावण्यात आल्याचा आरोप जी २३ नेत्यांनी केला आहे.

नवी दिल्ली : कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या घरी बुधवारी रात्री जी-२३ (G-23)नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत उत्तरप्रदेश प्रभारी असलेल्या प्रियंका गांधी (priyanka gandhi) यांच्यावरच थेट निशाणा साधण्यात आला. ''पाच राज्यांतील पराभवानंतर प्रभारी सरचिटणीसांचा राजीनामा का घेतला नाही?,'' असा सवाल जी २३च्या नेत्यांनी केला आहे. (Congress g 23 priyanka gandhi update news)

पाच राज्यातील पराभवानंतर पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या पाचही राज्याच्या प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा मागितला आहे. या पार्श्वभूमीवर प्रभारी प्रियंका गांधी यांचा राजीनामा का घेतला नाही, असा सवाल जी-२३ च्या नेत्यांनी पक्षश्रेष्ठींनी विचारला आहे. या बैठकीत पराभवाचे आत्मचिंतन करण्यात आले.

''या पराभवाला जबाबदार लोकांचीच पराभवाचा आढावा घेणाऱ्या समितीत वर्णी लावण्यात आल्याचा आरोप जी २३ नेत्यांनी केला आहे. ''काँग्रेसचा कारभार काही ठराविक लोकांकडे असल्याचे आरोप या बैठकीत करण्यात आला. पाच राज्यातील निवडणुकीत पराभव झाल्यानंतर कॉग्रेस पार्टी आता अॅक्शन मोडमध्ये आली आहे. तीन राज्याच्या प्रदेशाध्यक्षांनी बुधवारी राजीनामा दिला आहे.

priyanka gandhi
IPL:मनसे-ठाकरे सामना रंगणार ; शिवसेनेची भूमिका कधीच भूमिपुत्रांबाबत नव्हती..

जी-२३मधील नेते, माजी केंद्रीयमंत्री कपिल सिब्बल (Congress Leader Kapil Sibal)यांच्यावर कॉग्रेसच्या नेत्यांनी बुधवारी लोकसभेत हल्लाबोल केला. त्यामुळे कॉग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. ''गांधी परिवाराने नेतृत्व सोडावे,'' असा सल्ला कपिल सिब्बल यांनी दिल्यानंतर ते सध्या कॉग्रेसच्याच निशाण्यावर आहे. त्याचे पडसाद लोकसभेत उमटले.

priyanka gandhi
फडणवीस पेन ड्राईव्ह प्रकरणात नवा ट्विस्ट ; तेजस मोरेंच्या विरोधात गुन्हा दाखल

लोकसभेत कॉग्रेसचे नेता अधीर रंजन चैाधरी (Adhir Ranjan Chowdhury)यांनी कपिल सिब्बल यांच्यावर टीकास्त्र सोडले. चैाधरी म्हणाले, ''कपिल सिब्बल कुणाचे नेते आहेत, मला माहित नाही. पण कॉग्रेसमुळे त्यांची राजकीय जीवनात खूप प्रगती झाली आहे. ते जेव्हा युपीए सरकारमध्ये केंद्रीयमंत्री होते तेव्हा त्यांच्याबाबत सारे काही आलबेल होते. आता कॉग्रेस सत्तेत नसल्याने त्यांना वाईट वाटत आहे,''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com