Karnataka News : काँग्रेसने शब्द पाळला; पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत 'पाच गॅरंटी' बाबत आदेश; मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले…

Karnataka Congress News : कर्नाटकमध्ये काँग्रेसने निवणुकीच्या प्रचारत पाच मोठी आश्वासने दिली होती.
Siddaramaiah News
Siddaramaiah NewsSarkarnama

Chief Minister Siddaramaiahs important orders : कर्नाटकमध्ये काँग्रेसने निवणुकीच्या प्रचारत पाच मोठी आश्वासने दिली होती. ही आश्वासने पहिल्याच कॅबिनेट बैठकीत पूर्ण केली जातील, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले होते. कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज शपथ घेतली. त्यानंतर, लागलीच विधानसभेत मंत्रिमंडळ बैठकही पार पडली. या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचे आदेश काढले आहेत.

काँग्रेसने (Congress) निवडणूक जाहीरनाम्यात पाच आश्वासने दिली होती. या आश्वासनांना फाइव्ह गॅरंटी म्हटले होते. याच पाच आश्वासनांच्या पूर्तेतेसाठी नवनियुक्त मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आदेश काढले. तसेच, पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीपर्यंत या आश्वासनांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर सिद्धरामय्या यांनी विधानसभेत पत्रकार परिषद घेतली.

Siddaramaiah News
Dk Shivkumar News : सिद्धरामय्या विधानसभेत निघून गेले; डी. के. शिवकुमारांच्या कृतीने वेधले सगळ्यांचे लक्ष

काँग्रेसने पाच आश्वासने दिली होती

1) 'गृह ज्योती' अंतर्गत प्रत्येक घरासाठी २०० युनिट वीज मोफत.

2) 'गृह लक्ष्मी' योजनेंतर्गत कुटुंबप्रमुख असलेल्या महिलेला प्रति महिना दोन हजार रुपये.

3) 'युवा निधी' योजनेच्या माध्यमातून पदवीधर व पदविका घेतलेल्या बेरोजगार तरुणांना भत्ता.

4) 'उचित प्रयत्न' योजनेच्या माध्यमातून सर्व महिलांना राज्य परिवहन विभागाच्या बसमधून मोफत प्रवास.

5) 'अन्न भाग्य' योजनेच्या माध्यमातून दारिद्र रेषेच्या खाली असलेल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला १० किलो धान्य.

या योजनांच्या अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले आहेत. पुढील मंत्रिमंडळ बैठकीपासून याची अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन सिद्धरामय्या यांनी देले आहे. दरम्यान, या आश्वासन पूर्ततेसाठी सरकारला ५० हजार कोटींचा खर्च येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

Siddaramaiah News
Karnataka Cabinet News : काँग्रेसने मंत्रिमंडळात असे साधले जातीय समीकरण; दक्षिण कर्नाटकला झुकते माप

दरम्यान, बेंगळुरू येथील श्री कांतीराव स्टेडियमवर हा शपथविधी सोहळा झाला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge), राहुल गांधी (Rahul Gandhi), प्रियांका गांधी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते या सोहळ्याला उपस्थित होते.

आज (ता.२०) आठ मंत्र्यांनीही शपथ घेतली असून कर्नाटकचे नवे मंत्रिमंडळ आता सज्ज झाले. जी परमेश्वरा, के एच मुनियप्पा, के जे जॉर्ज, एम बी पाटील, सतीश जारकीहोळी, प्रियांक खर्गे, रामलिंगा रेड्डी व बी झेड जमीर अहमद खान यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी या मंत्र्यांना शपथ दिली आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com