क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदाराची काँग्रेसमधून हकालपट्टी; आमदारकीही जाणार?

राज्यसभा निवडणुकीत हरयाणामध्ये काँग्रेसला धक्का बसला आहे.
Congress Latest Marathi News, Congress News, Rajya Sabha Election News
Congress Latest Marathi News, Congress News, Rajya Sabha Election NewsSarkarnama

नवी दिल्ली : राज्यसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रासह हरयाणामध्येही भाजपने चमत्कार घडवला. पुरेसं संख्याबळ नसताना महाराष्ट्रात भाजपचा तिसरा उमेदवार निवडून आला. तर हरयाणात काँग्रेसचा आमदार फोडत भाजपने अपक्ष उमेदवार निवडून आणला. या आमदाराला क्रॉस वोटिंग करणं महागात पडलं आहे. काँग्रेसनं पक्षातून हकालपट्टी केली असून आमदारकी रद्द करण्याची मागणीही केली जाणार आहे. (Congress Latest Marathi News)

हरयाणातील काँग्रेसचे आमदार कुलदीप बिश्नोई यांनी क्रॉस वोटिंग केल्याने काँग्रेसचे उमेदवार अजय माकन यांचा पराभव झाला आहे. माकन हे गांधी कुटुंबियांच्या अत्यंत जवळचे नेते असल्याने त्यांचा पराभव पक्षाच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे बिश्नोई यांच्यावर शनिवारी तातडीने कारवाई करण्यात आली. (Congress expels Haryana MLA Kuldeep Bishnoi)

Congress Latest Marathi News, Congress News, Rajya Sabha Election News
औरंगाबाद विमानतळाला संभाजी महाराजांचे नाव देणार? ज्योतिरादित्य शिंदेंनीच सांगितलं

हरयाणा काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, बिश्नोई यांनी माकन यांना मतदान केलं आहे. त्यांनी भाजपने पुरस्कृत केलेले अपक्ष उमेदवार कार्तिकेय शर्मा यांच्या पारड्यात मत टाकलं. त्यामुळे माकन यांचा निसटता पराभव झाला. तसेच बिश्नोई यांच्यासह आमदार किरण चौधरी यांनीही चुकीच्या पध्दतीने मतदान केलं, असा दावाही काँग्रेसनं केला आहे.

माकन यांना शर्मा यांच्यापेक्षा केवळ 0.66 मतं कमी मिळाली आहेत. त्यामुळे काँग्रेसनं बिश्नोई यांना तातडीने सर्व पदांवरून हटवण्याचे आदेश दिले. आता त्यांच्याविरोधात विधानसभेच्या अध्यक्षांकडे तक्रार केली जाणार आहे. पक्षाचा व्हीप न मानल्याने त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली जाणार आहे.

बिश्नोई हे राज्यसभा निवडणुकीच्या काही दिवस आधीपासूनच पक्षाच्या कोणत्याही बैठकीला हजर राहिले नाहीत. प्रदेशाध्यक्ष पदासाठी ते आग्रही होते. याबाबत ते उघडपणे नाराजी व्यक्त करत होते. त्यांनी माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंग हुडा यांच्यावरही टीका केली होती. राज्यसभेच्या निवडणुकीत आंतरआत्म्याचा आवाज ऐकून मतदान करणार असल्याचे त्यांनी आधीच सांगितले होते. त्यामुळे काँग्रेस त्यांच्या मतदानाबाबत आधीपासूनच साशंकता होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com