देशात पहिल्यांदाच एका ठिकाणासाठी आठ रेल्वेगाड्यांना पंतप्रधानांकडून हिरवा झेंडा

गुजरातमधील केवडियापर्यंत देशाच्या विविध आठ ठिकाणांहून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज हिरवा झेंडा दाखविला.
Congress done works only on papers says PM Narendra Modi
Congress done works only on papers says PM Narendra Modi

नवी दिल्ली : गुजरातमधील केवडियापर्यंत देशाच्या विविध आठ ठिकाणांहून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज हिरवा झेंडा दाखविला. देशात पहिल्यांदाच एकाच ठिकाणासाठी एकाचवेळी आठ रेल्वेगाड्यांची सुरूवात करण्यात आली आहे.

केवडियामध्ये जगातील सर्वात उंच सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे. वाराणसी, दादर, अहमदाबाद, हजरत निझामुद्दीन, रीवा, चेन्नई, प्रतापनगर येथून धावणाऱ्या गाड्यांना पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखविला. यावेळी बोलताना रेल्वे प्रकल्पांना झालेल्या विलंबाला युपीए सरकारच जबाबदार असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

देशासाठी महत्वाचा असलेल्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पाचे 2006 ते 2014 या आठ वर्षात केवळ कागदावरच काम झाले. या काळात एक किलोमीटर रेल्वमार्गही तयार होऊ शकला नाही. आता पुढील काही महिन्यांतच एकुण 1100 किलोमीटरचा मार्ग पुर्ण होणार असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

मागील काही वर्षात देशातील रेल्वे सुविधांना आधुनिक बनविण्यासाठी अभूतपूर्व काम करण्यात आले आहे. स्वातंत्र्यानंतर आपली संपुर्ण ताकद आधीपासून जुन्याच रेल्वे व्यवस्थेला सुधारण्यात गेली. या काळात नवीन तंत्रज्ञान व सुविधाकडे दुर्लक्ष करण्यात झाले.

कोरानाचे संकट असूनही रेल्वे प्रकल्प पुर्ण झाले आहेत. पण आधी असे संकट आले असते तर हे प्रकल्प अडकून पडले असते. केवडियाला रेल्वेने जोडण्याच्या प्रकल्पामध्ये कोरोना, खराब हवामानासह अनेक अडथळे आले. पण विक्रमी वेळेमध्ये हे काम पुर्ण करण्यात आले,' असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

आम्ही अनेक टप्प्यांवर विविध केले. आम्ही नवीन उत्पादन तंत्रज्ञानाचा वापर रेल्वेकडून केला जात आहे. रेल्वेमार्गासह तांत्रिक कामे, सिग्नलिंग आदी कामांसाठी तंत्रज्ञानाचा आधार घेत आहोत. देशभरात रेल्वेचे जाळे तयार केले जात आहे. हाय स्पी़ड ट्रेन चालविण्यासाठी आपण सक्षम आहोत. रेल्वे उत्पादन व तंत्रज्ञानामध्ये आत्मनिर्भरता ही आपली ताकद आहे.

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com