Congress On BJP :‘भाजपच्या माजी मंत्र्याची प्रतिमत सहा हजार वाटण्याची तयारी’ : काँग्रेसची नड्डांसह चौघांविरोधात पोलिसांत तक्रार

काँग्रेसचे डी. के. शिवकुमार यांचा भाजपचे माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्यावर गंभीर आरोप
BJP-Congress
BJP-CongressSarkarnama

बंगळूर : भारतीय जनता पक्षाचे (BJP) माजी मंत्री रमेश जारकीहोळी (Ramesh Jarkiholi) यांनी कर्नाटकातील (Karnataka) एकूण पाच कोटी मतदारांना प्रतिमत सहा हजार रुपये वाटण्याची तयारी केली आहे, असा आरोप काँग्रेसचे (Congress) कर्नाटक प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार (D. K. ShivKumar) यांनी केला आहे. दरम्यान, याबाबतची तक्रार आपण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (JP Nadda) यांच्याकडेही केली होती. मात्र, त्यांनीही त्याकडे दुर्लक्ष केल्याने नड्डा यांच्यासह जारकीहोळी यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिल्याचे शिवकुमार यांनी सांगितले. (Congress D. K. Shivkumar's serious allegations against former BJP minister Ramesh Jarkiholi)

BJP-Congress
Thackeray At Thane : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची सावली बनले राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड!

शिवकुमार यांच्यासह विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या या दोघांच्या सह्या तक्रार अर्जावर आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी करावी, अशी मागणीही या काँग्रेस नेत्यांनी केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याविरोधात ही तक्रार देण्यात आलेली आहे.

BJP-Congress
Nagar Congress Committee : नाना पटोलेंचा बाळासाहेब थोरातांना दे धक्का : नगरची अख्खी जिल्हा काँग्रेस कमिटीच बरखास्त

दरम्यान, बेळगावमधील रॅलीत बोलताना आमदार जारकीहोळी यांनी काँग्रेस आमदाराने रोख तीन हजार रुपये व भेटवस्तू दिली तर आपण प्रत्येक मतदाराला सहा हजार रुपये आणि भेटवस्तू देऊ, असे विधान केले होते. विधानसभा निवडणुकीत भाजप प्रत्येक मताला सहा हजार रुपये देणार असेही त्यांनी म्हटले होते. तर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काँग्रेसने देशात भ्रष्टाचाराला जन्म घातला, असे म्हटले होते. त्यानंतर शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांनी बंगळूरमधील हाय ग्राऊंडस पोलिस ठाण्यात ही तक्रार दिली आहे.

बंगळूरमध्ये बोलताना शिवकुमार यांनी रमेश जारकीहोळी यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे. शिवकुमार म्हणाले, ‘‘जारकिहोळी यांनीच आमचा काँग्रेस पक्ष बरबाद केला. सीबीआयने या प्रकरणाची चौकशी करावी. काँग्रेसने भ्रष्टाचाराला जन्म दिला, असे म्हणणारे मुख्यमंत्रीच टीम भ्रष्टाचाराचे जनक आहेत.’’

BJP-Congress
Congress News : सत्यजित तांबेंना पाठिंबा देणे पडले महागात : काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद गमावावे लागले

रमेश जारकीहोळी यांनी राज्यातील एकूण पाच कोटी मतदारांना प्रतिमत सहा हजार रुपये वाटण्याची तयारी केली असल्याचा आरोपही शिवकुमार यांनी केला. या संदर्भात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा, नलिनकुमार कटील, बोम्मई आणि रमेश जारकीहोळी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. नड्डा यांनी जारकीहोळी यांच्याविरोधात तक्रार करून एफआयआर दाखल करायला हवा होता. मात्र, कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे आम्ही नड्डा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे, असे शिवकुमार यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com