आमच्या 19 आमदारांशिवाय मुख्यमंत्री कसं बनाल? काँग्रेसनं दाखवला आरसा
Congress File Photo

आमच्या 19 आमदारांशिवाय मुख्यमंत्री कसं बनाल? काँग्रेसनं दाखवला आरसा

आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे चित्र आहे. दोन्ही पक्षांतील नेते एकमेकांवर उघडपणे आरोप-प्रत्यारोप करू लागले आहेत.

पटना : जातनिहाय जनगणनेवरून बिहारमध्ये (Bihar Politics) सत्तेत असलेल्या संयुक्त जनता दल व भाजपमध्ये दावे-प्रतिदावे केले जात आहेत. तर दुसरीकडे विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दल (RJD) आणि मित्रपक्ष काँग्रेसमध्ये (Congress) मुख्यमंत्रिपदावरून वाद सुरू झाला आहे. बिहारमधील या आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे चित्र आहे. दोन्ही पक्षांतील नेते एकमेकांवर उघडपणे आरोप-प्रत्यारोप करू लागले आहेत.

बिहार काँग्रेसचे प्रभारी भक्त चरण दास यांनी रविवारी आरजेडीला आरसा दाखवला. ते म्हणाले, आरजेडी नते तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) हे काँग्रेसच्या 19 आमदारांच्या पाठिंब्याशिवाय सरकार बनवू शकत नाहीत. आरजेडीला हे समजायला हवं की, 19 आमदारांचे समर्थन म्हणजे छोटी गोष्ट नव्हे. बिहारमध्ये सरकार बनावं असं तेजस्वी यांना वाटत असेल तर काँग्रेसच्या आमदारांची गरज पडेल. त्यामुळे त्यांना काँग्रेसचा सन्मान राखला पाहिजे.

Congress
पंतप्रधान मोदी हुकूमशहा असल्याची टीका का? अमित शहांनीच सांगितलं कारण...

काँग्रेस मजबूत झाली तर आरजेडी सत्तास्थापन करू शकेल. कुशेश्वर स्थान आणि तारापूर विधानसभेच्या पोटनिवडणूकीत काँग्रेस विजयासाठी मैदानात उतरली आहे. विधानसभा पोटनिवडणूकीत मैत्रीपूर्ण लढत कुठेही होत नाही. या निवडणुकीत सगळ्यांना सर्वकाही समजेल. आरजेडीने आघाडीचा धर्म पाळला नाही तर सर्वाधिक नुकसान त्यांचे होईल, असंही दास यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, बिहारमध्ये विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. दोन्ही ठिकाणी 30 तारखेला मतदान होणार आहे. पण या निवडणुकीत आघाडीत फूट पडली आहे. दोन्ही जागांवर काँग्रेस व आरजेडीचे उमेदवार एकमेकांविरोधात उभे राहिले आहेत. काँग्रेसला कुशेश्वर स्थान हा मतदारसंघ हवा होता. या मतदारसंघात पक्षाचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होता, असा दावा काँग्रेसकडून करण्यात आला होता.

Congress
डच्चू दिल्यानंतर वरूण गांधींचा विरोधी सूर; म्हणाले, राजकीय स्वार्थासाठी...

बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व आरजेडीमध्ये आघाडी झाली होती. पण काँग्रेसला अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत. तर आरजेडीला मोठं यश मिळालं. पण काँग्रेसला कमी जागा मिळाल्यानं आघाडीची सत्ता स्थापन होऊ शकली नाही. जेडीयु व भाजप युतीनं काटावर बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली आहे.

Related Stories

No stories found.